Advertisement

सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स ११८ तर, निफ्टीत २८ अंकांची वाढ


सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स ११८ तर, निफ्टीत २८ अंकांची वाढ
SHARES

ग्लोबल मार्केटमधून मिळालेल्या पाॅझिटीव्ह संकेतांच्या आधारे सगल चौथ्या दिवशी शेअर बाजाराने तेजी नोंदवली. मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११८ अंकांची वाढ नोंदवत ३३, ४७८ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २८ अंकांची वाढ नोंदवून १०, ३२७ वर गेला.


कुठल्या शेअर्समध्ये वाढ?

सकाळी व्यवहारांना सुरूवात होताच बँकिंग, आटो, आयटी, मेटल, फार्मा, रियाल्टी, कन्झुमर डुरेबल्स, आईल अँड गॅस आणि पावर क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली विक्री झाली.


हेवीवेट कंपन्यांचे शेअर्सही वधारले

एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, डा रेड्डीज, भारती एअरटेल, एचयूएल, इन्फोसिस, सन फार्मा, एचडीएफसी बँक आणि मारूती या हेवीवेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याने शेअर बाजाराच्या तेजीला हातभार लागला.

बीएसईच्या स्माॅल कॅप आणि मीडकॅप इंडेक्समध्येही दिवसभरात चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचा स्माॅलकॅप इंडेक्स ०.३७ टक्क्यांनी वाढला. तर मीडकॅप इंडेक्स ०.१० टक्क्यांनी वाढला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा