Advertisement

Flipkart, Amazon फक्त पुरवणार अत्यावश्यक सेवा

Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंचा पुरवठा बंदच राहील.

Flipkart, Amazon फक्त पुरवणार अत्यावश्यक सेवा
SHARES

देशामध्ये ३ मे पर्यंत लॉकडाऊनची (Coronavirus Lockdown 2.0) घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान 20 एप्रिलपासून काही सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. मात्र रविवारी गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंचा पुरवठा बंदच राहील.

सरकारनं याआधी ई-कॉमर्स वेबसाइटवरील निर्बंध हटवले होते. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपण्याआधीच या वेबसाइट्सना त्यांचं काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी यामुळे मिळाली होती. काही वेबसाइट्सनी त्यांच्या स्मार्टफोन्सची देखील विक्री सुरू केली होती. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात ई-कॉमर्स वेबसाइट्सनी त्यांच्या सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी मर्यादित ठेवल्या होत्या.


अत्यावश्यक वस्तूंचीच डिलिव्हरी

सरकारनं लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना काम करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या काळात ते अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंचा पुरवठा नाही करू शकणार. गेल्या आठवणड्यात सरकारनं 20 एप्रिलपासून काही सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर Flipkart, Amazon सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी काही वस्तूंची ऑर्डर घेण्यास सुरूवात केली होती. मात्र गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता या कंपन्यांना केवळ अत्यावश्यक वस्तूंचाच पुरवठा करता येणार आहे.

संसर्ग नसलेल्या भागात २० एप्रिलपासून बाजारपेठा सुरू होणार असल्याचं गुरुवारी गृह मंत्रालयानं सांगितलं होतं. त्यानुसार सोमवारपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई कॉमर्स कंपन्या मोबाइल तसंच फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, एसी, कुलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे आणि शाळकरी मुलांसाठी स्टेशनरी विकणार होते. मात्र स्थानिक बाजारपेठांत मात्र या वस्तूंची दुकाने उघडणार नव्हती. पण आता फक्त जीवनावश्यक वस्तू विकल्या जातील हे सरकारनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

कोटक महिंद्रा बँकेची ‘एटीएम ऑन व्हील्स’ सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा