अर्णव गोस्वामींचा राजीनामा ?


SHARE

मुंबई - पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त सुत्रांनी दिलंय. गेल्या काही दिवसांपासून अर्णव गोस्वामी हे त्यांच्या ‘द न्यूज अवर’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसत नव्हते. संपादकीय बैठकीत अर्णव गोस्वामी यांनी आपला राजीनामा जाहीर केला. आपण स्वत: काहीतरी नवे सुरू करणार असल्याचंही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. अर्णव गोस्वामी नवीन वृत्त वाहिनी सुरू करण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्णव गोस्वामी ‘टाइम्स नाऊ’मध्ये संपादक पदावर कार्यरत आहेत. ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीवर ‘द न्यूज अवर’ या चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायम अर्णव गोस्वामी हेच करायचे. या कार्यक्रमावरील त्यांच्या आक्रमकपणामुळे ते कायम चर्चेत असतात. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या