Advertisement

लालबागच्या राजाला दिलेल्या भेटवस्तूंचा लिलाव

लालबागच्या राजाच्या चरणी कोट्यवधींचे दान

लालबागच्या राजाला दिलेल्या भेटवस्तूंचा लिलाव
SHARES

लालबाग राजाच्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात. यंदाच्या वर्षी देखील लाखो भविक बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. या भाविकांनी कोट्यवधींचे दान बाप्पाच्या चरणी अर्पण केले आहे. इतकेच नाही तर एका भविकाने ई दुचाकी बाप्पाला अर्पण केली आहे.

सर्व वस्तूंचा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी लिलाव करण्यात आला. हा लिलाव पाच तास चालला.

लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सवादरम्यान भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा किंवा मौल्यवान वस्तूंचा रविवारी लिलाव करण्यात आला.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या या लिलावात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. अनेकांनी आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार लिलावात सोने, चांदी किंवा इतर वस्तू खरेदी केल्या.

35 लाख अधिक उत्पन्न

लिलावात लोकांनी 35 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी केल्या. रविवारी सायंकाळी 5 ते 10 या वेळेत हा लिलाव पार पडला. बाप्पाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला.

55 लाखांचा हार

दरम्यान, या लिलावातून लालबागचा राजा मंडळाने 35 लाखांहून अधिक कमाई केली असली तरी लिलावात एकही हार विकला गेला नाही. 55 लाख रुपये किमतीचा हार कोणीही विकत घेतला नाही, त्यामुळे पुढच्या वर्षी या नेकलेसचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.



हेही वाचा

"जय श्रीराम" बोलला नाही म्हणून मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतियांकडून मारहाण

पनवेल: 100 बेघर लोकांना लवकरच कायमस्वरूपी निवारा मिळणार 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा