Advertisement

दृष्टीहीन मार्गदर्शक!


दृष्टीहीन मार्गदर्शक!
SHARES

रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एखादी दृष्टीहीन व्यक्ती दिसली, तर त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावतात. हे आपण अनेकदा पाहिलं असेल. पण त्याच्या अगदी उलट दृश्य ११ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. जिथे दृष्टीहीन व्यक्ती डोळस व्यक्तींना मार्गदर्शन करताना दिसतील.काय आहे स्टोरी?

'राऊंड टेबल ब्लाईंड मॅन'च्या वतीनं १२व्या कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीमधल्या गाड्या डोळस व्यक्तीद्वारे चालवण्यात येत असल्या तरी त्यांना रॅलीचा नकाशा, मार्ग दृष्टीहीन व्यक्ती सांगणार आहेत. दृष्टीहीन व्यक्ती चालकाच्या बाजूच्या सीटवर बसेल. रॅली ज्या मार्गानं जाईल, त्या मार्गाचा नकाशा बनवण्यात आला आहे. या नकाशानुसार दृष्टीहीन कार चालकाला मार्गदर्शन करेल. या रॅलीला सेलिब्रिटींचा देखील पाठिंबा असतो.  


रॅलीचा उद्देश

डोळस आणि दृष्टीहीन व्यक्तींमध्ये समन्वय निर्माण व्हावा या दृष्टीकोनातून दरवर्षी या अनोख्या रॅलीचं आयोजन करण्यात येतं. याशिवाय दृष्टीहिनांचा आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता वाढावी, डोळस व्यक्तींनी दृष्टीहीनांच्या समस्या समजावून घ्याव्यात या उद्देशानं या रॅलीचं आयोजन केलं जातं. या रॅलीतून येणारी रक्कम दृष्टीहीन, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे.कुठे होणार रॅली?

११ फेब्रुवारीला वरळी इथल्या एनएसआय इथं सकाळी ७ वाजल्यापासून ही अनोखी कार रॅली सुरू होणार आहे. साधारण ३५-४० किलोमीटर इतकं अंतर या रॅलीत पार करायचं आहे. रॅलीत सहभागी होणाऱ्यांनी स्वत:ची गाडी आणणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीला यात सहभागी करू शकता. तुमच्या कारच्या बॅक सिटवर त्यांना बसता येईल. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी फी १६०० असून नोंदणी करण्यासाठी या लिंकवर (https://goo.gl/forms/EYaTb1q8YVtR48Di2) क्लिक करा.हेही वाचा

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे! 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement