Advertisement

जनगणना २०२१ : द्यावी लागेल शौचालय, टीव्ही वाहन आणि मोबाइलसह ३१ बाबींची माहिती

जनगणना २०२१ (Census 2021) ची तयारी भारतात (india) सुरु झाली आहे. जनगणना कर्मचारी (Census staff) १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन जनगणनेची माहिती घेतील.

जनगणना २०२१ : द्यावी लागेल शौचालय, टीव्ही वाहन आणि मोबाइलसह ३१ बाबींची माहिती
SHARES

जनगणना २०२१ (Census 2021) ची तयारी भारतात (india) सुरु झाली आहे. जनगणना कर्मचारी (Census staff) १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन जनगणनेची माहिती घेतील. यावेळी हे कर्मचारी तुमच्याकडील शौचालय (Toilets), टीव्ही (tv), वाहने (vehicles) आणि मोबाइल (mobile) यासह ३१  गोष्टींबद्दल माहिती संकलित करतील. जनगणनाबरोबरच तुम्हाला राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) बद्दलही माहिती दिली जाईल. सप्टेंबर २०२० पर्यंत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मोबाइल नंबर फक्त जनगणनेच्या उद्देशाने विचारला जाणार असून तो अन्यत्र वापरला जाणार नाही. जनगणना पेन व कागदाऐवजी मोबाइल फोन अॅप्लिकेशन्स (applications) द्वारे जनगणना केली जाईल.


हे प्रश्न जनगणनावेळी विचारले जातील

  • इमारत क्रमांक (नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरण क्रमांक)
  • जनगणना घर क्रमांक
  • छप्पर, भिंत आणि कमाल मर्यादामध्ये वापरली जाणारी सामग्री
  • कोणत्या उद्देशाने घर वापरले जात आहे
  • घराची स्थिती
  • घर क्रमांक
  • घरी राहणाऱ्या लोकांची संख्या
  • कुंटुंब प्रमुखाचे नाव
  • कुंटुंब प्रमुखाचे लिंग
  • कुटुंबातील प्रमुख एससी / एसटी किंवा इतर समुदायाचे आहेत काय?
  • घराच्या खोल्या
  • घरात किती विवाहित जोडपे राहतात
  • पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत
  • घरात पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता
  • विजेचा मुख्य स्रोत
  • शौचालय आहे की नाही
  • कोणत्या प्रकारची शौचालये आहेत
  • ड्रेनेज सिस्टम
  • स्वयंपाकघर आहे की नाही, त्यात एलपीजी / पीएनजी कनेक्शन आहे की नाही
  • स्वयंपाकघरासाठी वापरले जाणार इंधन
  • रेडिओ / ट्रान्झिस्टर
  • दूरदर्शन
  • इंटरनेटची सुविधा आहे की नाही
  • लॅपटॉप, संगणक आहे की नाही
  • टेलिफोन / मोबाईल फोन / स्मार्टफोन वापरता की नाही
  • सायकल / स्कूटर / मोटरसायकल / मोपेड आहे की नाही
  • कार / जीप / व्हॅन आहे की नाही
  • घरात कोणते धान्य खाल्ले जाते
  • मोबाइल नंबर



हेही वाचा -

विमा पॉलिसीवर खुश नसल्यास ती परत करू शकता, 'हा' आहे नियम

बजेट २०२०: नोकरदारांना मोठा दिलासा, ‘अशी’ आहे नवीन कररचना




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा