Advertisement

५०० चीनी उत्पादनांवर CAIT चा बहिष्कार, जाणून घ्या यादी

CAIT नं ५०० हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी जाहीर केली आहे. जाणून घ्या यादीत कुठल्या वस्तूंचा समावेश आहे ते...

५०० चीनी उत्पादनांवर CAIT चा बहिष्कार, जाणून घ्या यादी
SHARES

लडाख सीमेवर (Ladakh Border) वर भारत-चीनमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे (India-China Rift) व्यापारी संघटना असणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)नं देशामध्ये चिनी उत्पादकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता CAIT नं ५०० हून अधिक कॅटेगरीतील उत्पादकांची यादी जाहीर केली आहे.

चीनची भूमिका देशहिताविरोधात असल्यानं CAIT नं चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कॅटनं 'भारतीय सामान, हमारा अभिमान' या अभियानाअंतर्गत ५०० हून अधिक कॅटेगरीतील उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३००० पेक्षा जास्त उत्पादकांचा समावेश आहे, जे चीनमध्ये तयार होतात आणि भारतात आयात केले जातात.

अभियानाच्या पहिल्या चरणात कॅटनं खालील वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. या ५०० कॅटेगरीमध्ये समावेश असणाऱ्या ३००० वस्तूंमध्ये रोजच्या वापरातील वस्तूंचा देखील समावेश आहे.

  • खेळणी
  • फर्निशिंग फॅब्रिक
  • टेक्सटाइल
  • बिल्डर हार्डवेअर
  • फुटवेअर
  • गारमेंट,
  •  स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू
  • लगेज
  • हँड बॅग
  • कॉस्मेटिक्स
  • गिफ्ट आयटम
  • इलेक्ट्रिकल तसंच इलेक्ट्रॉनिक्स
  • फॅशन अपॅरल
  • खाण्याचे पदार्थ
  • घड्याळं
  • काही प्रकारचे दागिने
  • वस्त्र
  • स्टेशनरी
  • कागद,
  • फर्नीचर
  • लायटिंग
  • हेल्थ प्रोडक्ट्स
  • पॅकेजिंग प्रोडक्ट
  • ऑटो पार्ट्स
  • फेंगशुई आयटम्स
  • दिवाळी तसंच होळीसाठी लागणारं सामान
  • चश्मा

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया यांनी माहिती दिली की, चीनमधून वार्षिक ५.२५ लाख कोटी अर्थात ७० बिलियन डॉलरची आयात केली जाते. सुरूवातीच्या टप्प्यात ३००० वस्तूंवर बहिष्कार टाकला जाणार आहे. या वस्तू भारतात देखील बनतात. मात्र चीनच्या वस्तू अधिक स्वस्त असल्यानं त्यांची आयात केली जाते. भारत या वस्तुंवर चीनवर अवलंबता कमी करू शकतो. चीनमध्ये बनणाऱ्या वस्तू भारतात आयात होऊ नये हे या अभियानेचे उद्दिष्ट आहे.

भारत- चीन सीमेवर सोमवारी रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान २० सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. चीनचे किमान ४३ सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.



हेही वाचा

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महाग

नीरव मोदीची 'इतकी' कोटींची मालमत्ता होणार जप्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा