Advertisement

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महाग

मागील दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महाग
SHARES
दररोज इंधन दर आढावा पुन्हा सुरु केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा धडाकाच लावला आहे. देशात सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ करण्यात आली. सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली होती.


मागील दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन रूपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. मंगळवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३.६२ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७३.७५ रूपये झाले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. तर चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.३७ रूपये प्रति लीटर,  डिझेलचे दर ७३.१७ रूपये प्रति लीटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७८.५५ रूपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर ७०.८४ रूपये प्रति लीटर झाले आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशनचा समावेश केला जातो. त्यामुळे दर जवळपास दुप्पट होतात.

दरवाढ

7 जून
पेट्रोल 78.67
डिझेल 67.55

8 जून
पेट्रोल 79.25
डिझेल 68.11

9 जून
पेट्रोल 79.77
डिझेल 68.65

10 जून
पेट्रोल 80.15
डिझेल 69.07

11 जून
पेट्रोल 80.73
डिझेल 69.62

12 जून
पेट्रोल 81.27
डिझेल 70.17

13 जून
पेट्रोल 81.84
डिझेल 70.71

14 जून
पेट्रोल 82.43
डिझेल 71.31

15 जून
पेट्रोल 82.70
डिझेल 72.64

16 जून
पेट्रोल 83.17
डिझेल 73.2


हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा