Advertisement

कोरोना व्हायरसची चिनी वस्तूंनाही 'लागण'

कोरोना व्हायरसचा फटका आता चिनी वस्तूंनाही (Chinese goods) बसला आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंचा भारतीय बाजारपेठेमध्ये तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना व्हायरसची चिनी वस्तूंनाही 'लागण'
SHARES

चीन (china) मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Corona virus) शेकडो लोकांचा बळी (death) गेला आहे. भारतासह इतर देशांमध्ये या व्हायरस पसरण्याची भिती आहे. कोरोना व्हायरसचा फटका आता चिनी वस्तूंनाही (Chinese goods) बसला आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंचा भारतीय बाजारपेठेमध्ये तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या वस्तूंची तुटवडा जाणवत असल्याने आता त्या महाग विकल्या जात आहेत. 

आपण वापरत असलेल्या बहुतांशी वस्तू ह्या चिनी आहेत. भारतातील संपूर्ण बाजारपेठ चिनी वस्तूंनी (Chinese goods) व्यापली आहे.  घरगुती वस्तू , शोभेच्या वस्तू , दररोज वापरातल्या वस्तू, चपलापासून मोबाईलपर्यंत अशा सर्वच वस्तू चीनमधून मुंबईतील व्यापारपेठांमध्ये विक्रीसाठी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे बहुतांश लोक या वस्तू खरेदी करतात.मात्र, आता चीनमध्ये जीवघेणा कोरोना व्हायरस पसरल्याने या वस्तूंची तुटवडा भासू लागला आहे. मागील १५ दिवसांपासून चीनमधून जगभरात पाठवला जाणारा माल तसाच पडून आहे. कोरोना व्हायरसच्या धसक्याने चीनी बाजारपेठ ठप्प झाली आहे. मुंबई बाजारापेठेवरही याचा परिमाण दिसून येत आहे. चिनी वस्तू न आल्याने आधी असल्याने वस्तूंच्या किमती आता वाढल्या आहेत. 


चीनमधून इतर देशांमध्ये पाठवला जाणारा माल सध्या पाठवण्यात येत नाही. त्यामुळे जगभरातील सर्वच बाजारपेठेत चिनी मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात झालेली आहे. यामुळे या वस्तूंचे भावही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पुढील किमान तीन महिने तरी चिनी वस्तू बाजारात चढ्या भावाने विकल्या जाणार आहेत. कारण येत्या जून महिन्यापर्यंत चीनमधून मालाची आवक होईल असं व्यापाऱ्यांना वाटत नाही.



हेही वाचा -

गौतम नवलखा, तेलतुंबडे यांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

सायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा