Advertisement

गुरूवारपासून धार्मिक स्थळे उघडणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली सर्व धार्मिक स्थळं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरूवार ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

गुरूवारपासून धार्मिक स्थळे उघडणार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली सर्व धार्मिक स्थळं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरूवार ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून, आता मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारांचा कारभार सांभाळणारे प्रशासनही सज्ज झालं आहे. दरम्यान धार्मिक स्थळे जरी उघडण्यात आली असली, तरी जबाबदारीचा विसर पडता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

धार्मिक स्थळांमध्ये जाताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होण्याकरिता सरकारनं काही अटीही घातल्या आहेत. सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनानं भाविकांना मंदिरात दर्शनासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध केली आहे. भाविकांसाठी दर गुरुवारी १२ वाजता मंदिराने जारी केलेल्या लिंकवरून किंवा मंदिर न्यासाच्या ॲपवरून क्यूआर कोड डाऊनलोड करता येणार आहे.

या क्यूआर कोडच्या माध्यमातून दररोज एका तासाला २५० भाविकांना दर्शन घेता येणार आहे. ६५ वर्षांवरील नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. मंदिरात भक्तांकडून हार, प्रसाद स्वीकारला जाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक. कोणत्याही प्रार्थनास्थळामध्ये किती भाविकांना प्रवेश दिला जावा, याचा निर्णय प्रार्थनास्थळाच्या व्यवस्थापन समिती वा ट्रस्टने घ्यायचा आहे.

नवरात्रीच्या काळात मुंबादेवी मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या वतीने ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध केला आहे. ही नोंदणी केल्यानंतर प्राप्त झालेल्या एसएमएसमध्ये उल्लेख असलेल्या दिवशी आणि वेळेतच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. यामध्ये मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ थर्मल तपासणी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आवश्यक आहे. मंदिरात प्रवेशासाठी दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा