Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

मुंबईतला ‘टोटल सन्नाटा २.०’

ज्या ठिकाणी लोकांची गर्दी, गोंगाट पाहायला मिळायचा ते परिसर आज निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. तिथं आज टोटल सन्नाटा आहे.

मुंबईतला ‘टोटल सन्नाटा २.०’
SHARES

घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई आज एकाकी थांबली आहे. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी, गोंगाट पाहायला मिळायचा ते परिसर आज निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. तिथं आज टोटल सन्नाटा आहे. यामुळेच कदाचित मुंबईची सुंदरता अजून खुलली आहे. मुंबईतील हेच दृश्य मुंबई लाइव्हनं कॅमेरात कैद केलं आहे. या 'सनसेट लवर्स' व्हिडिओला कंपोस्ट केलं आहे फ्रेंच डीजे, पेटिट बिस्किट यांच्या तर्फे...

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाझताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. पण अशा वातावरणात लोकांना प्रोत्साहित करम्यासाठी आणि आशेचा किरण म्हणन मुंबई लाइव्हनं ३ एप्रिलला एक व्हिडिओ लाँच केला होता. व्हिडिओमध्ये लॉकडाऊन दरम्यान मुंबईचे सुंदर रूप लोकांना पाहायला मिळाले. या व्हिडिओची प्रशंसा सर्व स्थरातून करण्यात आली. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील व्हिडिओची प्रशंसा करण्यात आली.

पहिल्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबई आणखी एक व्हिडिओ प्रेक्षकांसाठी घेऊन आलं आहे. या व्हिडिओमध्ये मुंबईचे रूप किती पालटलं आहे हे पाहायला मिळत आहे. मुंबई कधी इतकी सुंदर दिसलीच नसेल जेवढी ती या व्हिडिओत दिसत आहे. हा 'सनसेट लव्हर्स' व्हिडिओ फ्रेंच डीजे पेटिट बिस्किट यांनी तयार केला आहे.

मुंबईत कोरोनो व्हायरसचे संकट असूनही, या व्हिडिओमध्ये शहराच्या प्रत्येक भाग दर्शवला आहे. कधी या ठिकाणी गर्दी होती. लोकांचा गोंगाट होता. पण आज ती जागा शांततेनं घेतली आहे. तिकडे फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे शांतता, शांतता आणि शांतता...

व्हिडिओमध्ये आपल्याला मरीन ड्राईव्ह, सीएसएमटी, वांद्रे-वरळी सी लिंक, गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल पॅलेस हॉटेल, गिरगाव चौपाटी, बॅलार्ड इस्टेट, कार्टर रोड, दादर, लोअर परेल, वरळी सी फेस तसेच सनसेट यासारख्या मुंबईतील सर्वात सुंदर ठिकाणे दर्शविली आहेत.

हा व्हिडिओ शूट करणं खूप कठिण होतं. ठरलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि रात्रीचं सौंदर्य शूट करण्यासाठी सूर्यास्त होण्यापूर्वी उठावं लागायचं. यासाठी खूप संयम आवश्यक होता. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी ड्रोनबरोबरच गोप्रो आणि गिंबल यांचा देखील वापर करण्यात आला आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा