Advertisement

कोरोनात अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा

मंत्री एड. यशोमती ठाकूर म्हणाले की, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे अनाथांची एकूण संख्या सुमारे ६०० आहे.

कोरोनात अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा
SHARES

कोविडच्या साथीच्या आजारामुळे राज्यातील अनेक मुलं अनाथ झाली. दोन्हा पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अशा मुलांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली.

कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक मुले अनाथ झाली आहेत. अशा मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या एकूण सुरक्षेसाठी काही आर्थिक तरतूद करण्याची आवश्यक्ता होती.

त्यानुसार, कोविड महामारीमुळे अनाथ मुलांच्या खात्यात प्रत्येकी ५ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत राज्यातील ३०६ अनाथ बालकांच्या खात्यांमध्ये नुकतेच सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

मंत्री एड. यशोमती ठाकूर म्हणाले की, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे अनाथांची एकूण संख्या सुमारे ६०० आहे. उर्वरित मुलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील.

गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर, रायगड, अलिबाग, रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि पुणे, नागपूर अशा राज्यातील २४ जिल्ह्यांतील मुलांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केल्याचे तपशील नुकतेच विभागाला प्राप्त झाले आहेत. यामुळे या मुलांना थोडी आर्थिक सुरक्षा मिळाली असून विविध योजनांद्वारे या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील.


हेही वाचा

मालाडमधील स्कायवॉकच्या कामाला स्थानिकांचा विरोध

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा