Advertisement

जानेवारीत पहिले विश्व मराठी ऑनलाइन संमेलन

संमेलनामध्ये ३२ देशांतील, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषक बांधव, तसेच १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि एक हजारहून अधिक महाविद्यालये सहभागी होत आहेत.

जानेवारीत पहिले विश्व मराठी ऑनलाइन संमेलन
SHARES

विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन् महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी होणार आहे. 

सुमित्राताई महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून, उत्तर  अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका’च्या अध्यक्ष विद्या जोशी संमेलनाच्या महासंरक्षक असतील. 

 संमेलनामध्ये नऊ जणांचे अध्यक्षीय मंडळ असेल. डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष असून साहित्य विभाग - भारत सासणे, पुणे आणि डॉ. विनता कुलकर्णी, शिकागो - संस्कृती विभाग - सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट - उद्योजक विभाग - डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल कुलकर्णी, लंडन, युवा विभाग - उमेश झिरपे आणि अजित रानडे जर्मनी, हे संमेलनाध्यक्ष असतील.

२५ देशांमधून २५ स्वागताध्यक्ष असून, लीना सोहोनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलन आयोजक कार्यकारिणी ५१ जणांची असून, त्यात भारताबाहेरील विविध देशांतील २५, महाराष्ट्रातील १५ आणि भारतातील इतर राज्यांतील ११ व्यक्तींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि  शहरे यांतून २०१ प्रतिनिधी असून, महाविद्यालये समन्वयक समिती – ११ जण, संस्था समन्वयक समिती – ११ जण, वाचनालये समन्वयक समिती – ११ जण आणि विविध उपक्रम समन्वयक समिती – ११ जण, अशा एकूण २४५ व्यक्ती काम पाहणार आहेत.

संमेलनामध्ये ३२ देशांतील, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषक बांधव, तसेच १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि एक हजारहून अधिक महाविद्यालये सहभागी होत आहेत.

संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, कविकट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा - कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा - सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी बहुविध उपक्रम सादर केले जाणार आहेत.

संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत असून, त्यावर संमेलनाची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. देश-विदेशांतील मराठी बांधवांनी संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी करण्यासाठी www.sammelan.vmparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.



हेही वाचा

तब्बल अडीच तासांनी मुंबईतील वीजपुरवठा सुरुळीत

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शिवशाही बसच्या संख्येत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा