स्वस्त दरात साखर वाटप

 Ghatkopar
स्वस्त दरात साखर वाटप
स्वस्त दरात साखर वाटप
See all

विद्याविहार - घाटकोपर विकास मंच यांच्यावतीने गरीबांसाठी ‘स्वस्त दरात साखर वाटप’ करण्यात आले. विद्याविहार पूर्वेच्या आंबेडकरनगर ते शिवशंकरनगर येथे रविवारी सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जवळपासच्या परिसरातील एक हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त स्वस्त दरात साखर वाटप करण्यात आली. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला ८० रुपयात ३ किलो साखर देण्यात आली. या कार्यक्रमाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. घाटकोपर विकास मंचचे अध्यक्ष सुशील गुप्ता, वरुन यादव, संतोष पांडे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Loading Comments