निराधार मुलांसाठी 'ती' ठरली देवदूत

 Mumbai
निराधार मुलांसाठी 'ती' ठरली देवदूत

आजही समाजात तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळताना दिसत नाही. त्यांना स्वीकारताना आजही समाज घाबरतो. पण याच तृतीयपंथातील गौरी सावंत ही आश्रय नसलेल्या मुलांसाठी देवदूत ठरली आहे. मुंबईत निराधार मुलांना आश्रय उपलब्ध करून देण्याचे काम सध्या गौरी करत आहे. अशा मुलांच्या राहण्यासाठी ती दोन मजली आश्रम उभारणार आहे.

विशेष म्हणजे गौरीने देखील अनेक समस्यांना तोंड देत अडचणींचा सामना केला आहे. परिस्थितीवर मात करत ती अशा निराधार मुलांसाठी कार्यरत आहे. ज्यावेळी तिला समजले की, देह व्यापार करणाऱ्या महिलांच्या मुलांना निवारा आणि शिक्षण मिळत नाही. उलट या मुलांना देखील या व्यवसायत ढकलले जाते. तेव्हा तिने हा सर्व प्रकार थांबावा आणि अशा मुलांना देखील सामान्य जीवन जगता यावे या उद्देशाने आश्रम बांधण्याचा निर्णय घेतला.

                                                                                                                                                                                  (Courtsey- Youtube, Vicks)

गौरी सावंत तृतीयपंथ समाजातील असून देखील ती अनाथ मुलीचा सांभाळ करत आहे. एका कमर्शियल जाहिरातीत देखील ती दिसली आहे. ज्याला यू-ट्युबवर प्रंचड पसंती मिळाली. आई आणि मुलीच्या कथेवर आधारित ही जाहिरात आहे.

37 वर्षाच्या गौरीला तिचे सर्व मित्र-मैत्रिण खास मानतात. तृतीयपंथी समाजातील कुणी व्यक्ती अडचणीत सापडल्यास गौरी त्यांच्या मदतीसाठी धाऊन जाते. मुलांसाठी आश्रम बांधण्यासाठी लागणारी 50 टक्के रक्कम तिने आधीच जमा केली आहे. बाकीची रक्कम मिलाप संस्थेच्या माध्यामातून ती जमा करणार आहेत.

Loading Comments