Advertisement

मोबाइल कॉलवर पत्नीला दिला तीन तलाक

मोबाइल (mobile) वर काॅल (call) सुरू असतानाच एका पतीने (husband) आपल्या पत्नीला ( wife) तीन तलाक (triple talaq) दिला.

मोबाइल कॉलवर पत्नीला दिला तीन तलाक
SHARES

मोबाइल (mobile) वर काॅल (call) सुरू असतानाच एका पतीने (husband) आपल्या पत्नीला ( wife) तीन तलाक (triple talaq) दिला. तीन तलाक दिल्याने पत्नीने पतीविरोधात कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

पीडित महिला कांदिवली (Kandivali) पूर्वेला तिच्या आई-वडिलांसोबत राहते.  एप्रिल २०१८ तिचं लग्न झालं.  लग्नानंतर ती नवऱ्याबरोबर कळंबोलीला राहत होती. काही कालावधीनंतर सासू-सासऱ्यांसोबत तिचं भांडण झालं. त्यानंतर ती एप्रिल २०१९ मध्ये आई-वडिलांकडे आली होती. काही दिवसापूर्वी तिच्या बहिणीने मध्यस्थी करत तिच्या फोन केला होता. हे तिघेही जण कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. अचानक महिलेच्या नवऱ्याने तिला फोनवरच तीन तलाक (triple talaq) दिला. त्यानंतर महिलेने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 तक्रारीत महिलेने सासू-सासरे आणि नवरा छळ करत असल्याचं सांगितलं आहे.  महिलेने तक्रारीत म्हटलं की, सासू-सासऱ्यांच्या मागणीनुसार माझ्या आई-वडिलांनी माझ्या नवऱ्याला एक गाडी आणि राडो घड्याळ दिले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली. रोजच्या मानसिक आणि शारीरिक तणावामुळे डिसेंबर २०१८मध्ये माझा गर्भपातही झाला. मात्र यासाठी सासू-सासऱ्यांनी मलाच दोषी ठरवलं आणि माहेरून पैसे आणण्याची जबरदस्ती केली. आपल्या पतीविरोधात कळंबोली, मुंब्रा आणि मानखुर्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचं या महिलेला लग्नानंतर समजलं.



हेही वाचा -

लोअर परळ येथे डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

होमगार्डची सुरक्षा लवकरच पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा