लोअर परळमधील माणुसकीची भिंत


  • लोअर परळमधील माणुसकीची भिंत
  • लोअर परळमधील माणुसकीची भिंत
  • लोअर परळमधील माणुसकीची भिंत
SHARE

लोअर परळ - गणपतराव कदम मार्गावरील पेनेन्सुला बिझनेस पार्कच्या आवारात माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. गरजू व्यक्तींना इथे दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य आणि कपडे ठेवण्यात आले आहेत. बेघर म्हणून रस्त्यावर राहणाऱ्यांच्या मनाला थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दोन दिवसांचा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्व कार्यकर्ते मिळून प्रत्येक ठिकाणी माणुसकीची भिंत उभारून या गतिमान झालेल्या जीवनात माणुसकी आणि दान धर्म टिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असं माणुसकीची भिंतचे कार्यकर्ते सौरव पोखरे यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या