Advertisement

गरजूंची भूक भागवणारा मनसेचा ‘माणुसकीचा फ्रिज’

अडचणीत सापडलेल्या गरजूंच्या मदतीसाठी मनसेनं पुढाकार घेत माणुसकीचा फ्रिज नावाचा उपक्रम मुंबईत सुरू केला आहे. याद्वारे मनसेनं आपल्या 'माणुसकीचंं' कार्य केवळ लॉकडाऊनपुरतं मर्यादित न ठेवता पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

गरजूंची भूक भागवणारा मनसेचा ‘माणुसकीचा फ्रिज’
SHARES

राज्यात बऱ्यापैकी अनलॉक झालं असलं तरी अद्याप अनेकजण अजूनही अडचणीत आहेत. अशा अडचणीत सापडलेल्या गरजूंच्या मदतीसाठी मनसेनं पुढाकार घेत माणुसकीचा फ्रिज नावाचा उपक्रम मुंबईत सुरू केला आहे. याद्वारे मनसेनं आपल्या 'माणुसकीचंं' कार्य केवळ लॉकडाऊनपुरतं मर्यादित न ठेवता पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.     

लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणाऱ्यांनी किंवा गरजू मजुरांनी अन्नपाण्याअभावी जीव गमावल्याचं आपण वाचलं किंवा ऐकलं असेलच. हातावर पोट असणाऱ्या कित्येकांना लॉकडाऊनमध्ये एक वेळचं अन्न मिळेनासं झालं होतं. लहान लहान मुलं भुकेनं कासावीस होतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. अशा गरजूंना शासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी आपापल्या परीनं मदत केली. 

समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आजही अनेकजण विविध पद्धतीनं कार्यरत आहेत. कुणी गरजूंना कपडे देतं, तर कुणी अन्न देतंंय, कुणी शिक्षणाची सुविधा देतंय, तर कुणी निवाऱ्याची व्यवस्था करतंय. या मागचा उद्देश एकच तो म्हणजे माणसुकीच्या नात्यानं एखाद्याची मदत करणं. मग ती मदत कुठल्याही उपक्रमाद्वारे का असेना. हाच मनसेच्या अनोख्या उपक्रमा मागचा उद्देश आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या पुढाकारानं माणुसकीचा फ्रिज हा उपक्रम माहीम आणि दादर इथं सुरू होतोय. कुणीही उपाशीपोटी झोपू नये या प्रामाणिक भावनेतून ‘माणुसकीचा फ्रिज’ उपक्रम कार्यरत राहणार आहे. 

याबाबत नितीन सरदेसाई यांनी सांगितलं की, मनसेच्या माहीम आणि दादर इथल्या कार्यालयात फ्रिज ठेवला जाईल. नागरिकांनी या फ्रिजमध्ये त्यांच्या घरातील अतिरिक्त अन्न, फळे, बिस्कीट अशा कोणत्याही खाण्यायोग्य वस्तू आणून ठेवाव्यात व गरजूंनी त्या घेऊन जाव्यात.

"खरंतर आम्ही तीन ठिकाणी माणुसकीचा फ्रीज ठेवणार आहोत. सध्या तरी दोन जागा ठरल्या आहेत. तर तिसरा फ्रीज कुठे ठेवायचा हे लवकरच कळेल. जागा ठरली की तिसरा फ्रीजही गरजूंची भूक भागवण्यासाठी ठेवण्यात येईल. या आठवड्यातच या तिन्ही ठिकाणच्या फ्रिजचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला की आणखी फ्रिज वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातील."

नितिन सरदेसाई, नेते, मनसे

मनसेैनिकांद्वारे त्या फ्रिजमध्ये काही ना काही खायचे पदार्थ ठेवले जातीलच. पण मनसे तर्फे आसपासच्या नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलंय की, त्यांनी आपल्या घरचे चांगल्या दर्जाचे पदार्थ तिथे ठेवावेत. जेणेकरून ज्यांना गरज असेल ते तिथून घेऊ शकतील, असं देखील नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

कुठे ठेवणार माणुसकीचा फ्रिज?

१) नितीन सरदेसाई यांचं जनसंपर्क कार्यालय, शीतलादेवी मंदिराच्या समोर, माहीम

२) मनसे शाळा, शारदाश्रम शाळेजवळ

यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे रोज मोठ्या प्रमाणावर वाया जाणारं अन्न वाचवणं आणि अतिरिक्त अन्न गरजूंपर्यंत पोहोचवणं. रस्त्यावर राहणारे, आर्थिकदृष्ट्या शेवटच्या स्थानावर असणारे, गरीब आणि बेरोजगारांना या फ्रीजचा नक्कीच फायदा होईल.



हेही वाचा

Navratri 2020: कोरोनामुळं नवरात्रीत व्यवसाय करण्याऱ्यांवर आर्थिक संकट


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा