Advertisement

आरोही ठरली अटलांटिक पार करणारी जगातील पहिली महिला

मुंबईत राहणाऱ्या २३ वर्षीय कॅप्टन आरोही पंडितनं आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्यानं अटलांटिक महासागर पार केला आहे. अटलांटिक महासागर एकट्यानं पार करणारी ती जगातली पहिली महिला ठरली आहे.

आरोही ठरली अटलांटिक पार करणारी जगातील पहिली महिला
SHARES
Advertisement

मुंबईत राहणाऱ्या २३ वर्षीय कॅप्टन आरोही पंडितनं लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्यानं अटलांटिक महासागर पार केला आहे. अटलांटिक महासागर एकट्यानं पार करणारी ती जगातली पहिली महिला ठरली आहे. आरोहीनं ३००० किमीची हवाईयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली असून या कामगिरीचं श्रेय आरोहीनं तिच्या कुटुंबीय, मित्र परिवार आणि सहकाऱ्यांना दिलं आहे. तसंच, तिच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे.

३००० किमीची हवाईयात्रा

आरोही पंडितनं बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं असून, लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्यानं आरोहीने १३-१४ मेच्या मध्यरात्री युकेतील स्कॉटलँड येथून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर आरोही आईसलँड आणि ग्रीनलँड या दोन ठिकाणी थांबली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तिनं ३००० किमीची हवाईयात्रा पूर्ण केली. त्यानंतर तिने कॅनडातील Iqaluit विमानतळावर लँडिंग केलं.

वी! एक्सपीडिशन’

भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्यानं महिला सशक्ती अभिनयानांतर्गत, We Women Empower Expedition (‘वी! एक्सपीडिशन’) नावाची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत तीन टप्प्यांत संपूर्ण जगभर या एअरक्राफ्टनं प्रवास करत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा संदेश दिला जाणार आहे. या अंतर्गत आरोहीने हा विश्वविक्रम केला आहे.

विलक्षण अनुभव

'मी देशाची आभारी आहे. अटलांटिक महासागर एकटीने पार करण्याचा विलक्षण अनुभव होता. खाली निळ्या बर्फाप्रमाणे भासणारा समुद्र, वर निळं आकाश आणि त्यात छोटेसं विमान अस आरोहीने या यात्रेचं वर्णन केलं आहे. तसंच जगातील कोणतीही महिला अटलांटिक महासागर विमानाच्या सहाय्याने पार करु शकते, फक्त त्यासाठी जिद्द हवी', अस म्हणत आरोहीने महिलांना प्रोत्साहित केलं आहे.

५०० किलोचं विमान

आरोहीच्या लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टचं नाव 'माही' असं आहे. माही या विमानाचं वजन अवघं ५०० किलो आहे. तसंच, माही हे भारताचं पहिलं नोंदणीकृत लाईट सपोर्ट एअरक्राफ्ट आहे. हे विमानाची निर्मिती स्लोव्हेनिया या देशात करण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ७ दिवस राहणार बंद

पावसाळ्यात मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर ड्रोनची नजरसंबंधित विषय
Advertisement