Advertisement

पावसाळ्यात मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर ड्रोनची नजर

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पाणी साचण्याच्या, घाटाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय सर्व स्थानकांवरील आणि स्थानकांच्या परिसराचं सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर ड्रोनची नजर
SHARES

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यात असते. रेल्वे कर्मचारी पावसाळ्यात लोकल वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सतत प्रयत्न करत असतात. मात्र, रेल्वे मार्गावर पाणी साचणाऱ्या ज्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा पोहोचू शकत नाही, त्याठिकाणी मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे.

ड्रोनचा वापर

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पाणी साचण्याच्या, घाटाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय सर्व स्थानकांवरील आणि स्थानकांच्या परिसराचं सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. तसंच, अपघात, सुरक्षा यावर लक्ष ठेवण्याकरीता देखील ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळं गर्दीचं व्यवस्थापन, लोकल सेवा आणि दुर्घटनेचं नियोजन करणं सहज शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेचं लक्ष 

पावसाळ्यात पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेदरम्यान कोणतीही आपत्कालीन घटना घडू नये यासाठी डहाणू रोड ते चर्चगेट या ३७ स्थानकांवरील प्रत्येक घडामोडीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. मागील वर्षी ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात जास्त प्रमाणात पावसाचे पाणी साचलं होतं. त्यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.

तत्काळ उपाययोजना

या सर्व घटनांवर योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ड्रोनद्वारे रेल्वे मार्गावर पाणी साचणारे मुख्य ठिकाणे केंद्रित करून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील ११५ स्थानकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. त्याचप्रमाणं, सीएसएमटी ते इगतपुरी, लोणावळा आणि रोह्यापर्यंत ड्रोनद्वारे घाटातील परिसर, गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, भायखळा, सायन, कुर्ला, विद्याविहार येथे मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतं. त्यामुळं या ठिकाणी रेल्वे कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करून मान्सूनची योग्यती तयारी सुरू आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

पश्चिम आणि मध्य रेल्वे रेल्वे रुळांवर पाणी न तुंबण्यासाठी वाढणार रुळांची उंची



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा