Advertisement

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 'तो' झटतोय

मुंबईच्या सुभजीत मुखर्जी यांनी पाणीटंचाईवर उपाय म्हणून अनोखी संकल्पना राबवली आहे. मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटी आणि शाळांमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

SHARES

पावसाळा सुरु झाला की रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागतं. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीनं साठवलं गेलं तर पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच कमी होईल. मुंबईच्या सुभजीत मुखर्जी यांनी यावर उपाय म्हणून अनोखी संकल्पना राबवली आहे. मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटी आणि शाळांमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

हाऊसिंग सोसायटी आणि शाळांमध्ये रेन वाॅटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्याचं काम ते करतात. आतापर्यंत त्यांनी ३५ हून अधिक शांळांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात त्यांना यश आलं आहे. तर ५० हून अधिक शाळांमध्ये ही यंत्रणा बसवण्याचा त्यांचा मानस आहे


रेन वॉटर हार्वेस्टिंगच एक अशी संकल्पना आहे ज्याच्या मदतीनं पाणी टंचाईवर आपण मात करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीनं साठवलेलं पाणी पिण्यायोग्य नसतं. पण घरच्या कामासाठी, गाडी धुण्यासाठी अशा कामांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतं इतकं ते शुद्ध असतं.

सुभजीत मुखर्जी
रेन वॉटर हार्वेस्टिंग का गरजेचे?

जमिनीखालील पाणी संपूर्णपणे नष्ट झाले, तर ती पाण्याची पातळी पूर्ववत करण्याकरिता किमान दहा वर्षांच्या कालावधीसाठी पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरविले जाणे गरजेचे आहे. पाण्याचा मन मानेल तसा वापर केला जात असल्याने पाण्याचे स्तर कमी होत चालले आहे. बेसुमार वाढत चालेले नवनवीन इमारतींचे निर्माण, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय, मान्सून मध्ये कमी वृष्टी होणे, बेकायदेशीर रित्या खणलेल्या बोरवेल्स ह्या आणि अश्या काही कारणांमुळे जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय आहे रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचा... 


रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे?

पाऊस पडत असताना, ते पाणी वाहून न जाऊ देता, ते जमिनीमध्ये जिरेल अशी व्यवस्था करणे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग मध्ये पावसाचे पाणी घराच्या छतावरील टाकीमध्ये किंवा घराच्या जवळ जमिनीमधे असलेल्या टाकीमध्ये साठविले जाऊन, ते शुद्ध करून पाईप्सद्वारे पुन्हा जमिनीमध्ये जिरविले जाते. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी खूप जास्त खर्च करण्याची गरज नाही. जमिनीखाली जे पाणी असते, ते प्रदूषित असण्याची शक्यता असते. मात्र पावसाचे पाणी प्रदूषणरहित असल्याने ते साठविल्या जाणाऱ्या टाक्यांना किंवा पाईप्सना गंज लागण्याची शक्यता अगदीच कमी असते. शिवाय पावसाचे पाणी साठविले गेल्याने ज्या काळामध्ये पाण्याची कमतरता होते, त्या काळामध्ये हे पाणी उपयोगी पडू शकते.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा