Advertisement

लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यासाठी जानेवारीपासून नवा नियम

या निर्णयामुळं दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणं सोयीस्कर होणार आहे.

लँडलाइनवरून मोबाइलवर बोलण्यासाठी जानेवारीपासून नवा नियम
SHARES

लॅंडलाइनवरून मोबाइलवर फोन करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. येत्या १ जानेवारीपासून लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करायचा असेल तर, ग्राहकांना १ जानेवारीपासून मोबाइल नंबरच्या आधी शून्य (०) लावावं लागणार आहे. दूरसंचार विभागानं ट्रायच्या या निर्णयाला मान्यता दिली आहे. ट्रायनं या प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची शिफारस २९ मे २०२० रोजी केली होती. या निर्णयामुळं दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणं सोयीस्कर होणार आहे.

लँडलाइनवरून मोबाइलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या ट्रायच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं मोबाइल आणि लँडलाइन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात नंबर देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या परिपत्रकातील उल्लेखानुसार हा नियम लागू करण्यात आल्यानंतर लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल क्रमांकाच्या आधी शून्य लावावं लागणार आहे, असं दूरसंचार विभागानं २० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलं. 

दूरसंचार कंपन्यांना लँडलाइनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. सध्या ही सुविधा आपल्या क्षेत्राबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. फिक्स लाइन स्वीचमध्ये उपयुक्त घोषणा कराव्यात. ज्यामुळं फिक्स लाइन सबस्क्रायबर्सना सर्व फिक्स्डमधून मोबाईल कॉलच्या पुढे ० डायल करण्याच्या आवश्यकतेबाबत सांगता येईल, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

दूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी १ जानेवारीपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. डायल करण्याच्या पद्धतीत अशा प्रकारच्या बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवेसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त क्रमांक देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ही भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणा आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement