मातृदिनाच्या दिवशीच माकड झालं अनाथ

Goregaon East, Mumbai  -  

संपूर्ण जगभरात मातृदिन साजरा होत असताना याच दिवशी एक नवजात माकड अनाथ झाल्याची दुर्दैवी घटना गोरेगाव फिल्मसिटी येथे घडली आहे. रविवारी सकाळी गोरेगाव फिल्म सिटी येथील 'एक सुहानीसी लडकी' मालिकेच्या सेटच्या बाहेर एक जखमी अवस्थेतील माकडीण हातात नुकतंच जन्मलेलं माकडचं पिल्लू घेऊन बसलेली असल्याची माहिती अभिनेत्री जया भट्टाचार्य हिने फोन करून प्राणीमित्र सुनीश कुंजू यांना दिली.


प्राणीमित्र कुंजू घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना तिथे फक्त माकडाचं पिल्लू सापडलं. माकडीण नेमकी कुठे गेली याची कुणालाच माहिती नव्हती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे माकडाचं पिल्लू तीन दिवस आधीच जन्माला आलं होतं.

ही जखमी माकडीण परत येईल की नाही, ती जिवंत राहील की नाही, याची शाश्वती नसल्याने कुंजू हे माकडाचं पिल्लू आपल्या घरी घेऊन आले. जोपर्यंत त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवले जात नाही, तोपर्यंत त्याचा सांभाळ करणार असल्याचे 'प्लॅन अँड अॅनिमल केअर सोसायटी'च्या सदस्या निशा कुंजू यांनी सांगितले.

Loading Comments