हाजी अली ट्रस्टची सुप्रीम कोर्टात धाव

  Pali Hill
  हाजी अली ट्रस्टची सुप्रीम कोर्टात धाव
  मुंबई  -  

  मुंबई - महिलांना हाजी अली दर्ग्यातल्या मजारमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी हाजी अली ट्रस्टने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.26 ऑगस्टला मुंबई हायकोर्टाने महिलांना मजारमध्ये जाण्यास परवानगी दिली होती. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात हाजी अली ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

  महिलांच्या प्रवेशासाठी डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकर्टाने हाजी अली दर्ग्यातल्या मजारीपर्यंत प्रवेशास परवानगी दिली होती. हायकोर्टाच्या निर्णयाच स्वागत करत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केला होता. मात्र त्यावेळी तृप्ती देसाईंना मजारपर्यंत जाता आले नव्हते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.