Advertisement

भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य ट्वीटरवर ट्रोल

पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात येत आहे. #SurgicalStrike2 #SurgicalStrike #IndianForce असे हॅश टॅग वापरून पाकिस्तान विरुद्ध अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.

भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य ट्वीटरवर ट्रोल
SHARES

पुलवामा इथं झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याला भारताकडून अखेर चोख उत्तर देण्यात आलं आहे. अवघ्या १२ दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला करत दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. बालकोट इथल्या जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला केला. 

पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर देशभरात आनंद साजरा करण्यात येत आहे. अनेकांनी ट्वीटरवरून हल्ल्याचं समर्थन केलं आहे. याशिवाय #SurgicalStrike2 #SurgicalStrike #IndianForce असे हॅशटॅग वापरून पाकिस्तानविरुद्ध अनेक मिम्स व्हायरल होत आहेत. या मिम्समध्ये कुठे भारतीय जवानांचं कौतुक करण्यात आलं आहे, तर कुठे पाकिस्तान सैन्य आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची थट्टा उडवण्यात आली आहे. अशाच काही ट्वीट्सवर नजर टाकूया.









हेही वाचा

पाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का? जाणून घ्या

मुंबई हाय अलर्टवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा