Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराचा सर्वसामान्यांना फटका

येत्या काळात या खर्चातुन चालकांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराचा सर्वसामान्यांना फटका
SHARES

मुंबईसह देशभरात सध्या पेट्रोल व डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांच्या महिन्याच्या आर्थिक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी वाहन चालवायचं की नाही? असा सवाल वाहन चालकांना सतावतोय. त्यामुळं येत्या काळात या खर्चातुन चालकांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. इंधनाच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल १०४.४४ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल ९३.१८ रुपये प्रति लीटर आहे. सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत ३० पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात ३५ पैशांनी वाढ झाली होती.

या महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसात पेट्रोलच्या किंमतीत २.८० रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत ३.३० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

४ प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल, डिझेलची किंमत

  • मुंबई पेट्रोल ११०.४१ रुपये आणि डिझेल १०१.०३ रुपये प्रति लीटर
  • दिल्ली पेट्रोल १०४.४४ रुपये आणि डिझेल ९३.१७ रुपये प्रति लीटर
  • चेन्नई पेट्रोल १०१.७९ रुपये आणि डिझेल ९७.५९ रुपये प्रति लीटर
  • कोलकाता पेट्रोल १०५.०९ रुपये आणि डिझेल ९६.२८ रुपये प्रति लीटर

तुमच्या शहरातील आजचे दर तपासा

  • देशातील तीन तेल कंपन्या HPCL, BPCL आणि IOC सकाळी 6 नंतर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. 
  • नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. 
  • मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे दर तपासू शकता. 
  • 92249 92249 वर एसएमएस पाठवून तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. 
  • तुम्हाला RSP पेट्रोल पंप डीलर कोड 9224992249 वर पाठवावा लागेल. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा