Advertisement

'टिस'मध्ये समलैंगिक विद्यार्थ्यांसाठी हाॅस्टेल!

'टिस'ने समलैंगिक समाजासाठी 'जेंडर न्यूट्रल' हाॅस्टेल सुरू केलं असून या हाॅस्टेलमध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर यांच्यासोबतच इतर विद्यार्थ्यांनाही राहता येणार आहे.

'टिस'मध्ये समलैंगिक विद्यार्थ्यांसाठी हाॅस्टेल!
SHARES

भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचं सर्वाेच्च न्यायालयाने जाहीर केल्याने समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. सोबतच या निर्णयानंतर समलैंगिक समाजाला आधार देण्यासाठी काही संस्थांनी खुलेपणाने पुढाकार घेण्यासही सुरूवात केली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस)ही यापैकीच एक. 'टिस'ने समलैंगिक समाजासाठी 'जेंडर न्यूट्रल' हाॅस्टेल सुरू केलं असून या हाॅस्टेलमध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीर यांच्यासोबतच इतर विद्यार्थ्यांनाही राहता येणार आहे.


कुठे आहे हाॅस्टेल?

यापूर्वी इतर कुठल्याही हाॅस्टेलप्रमाणे समलैंगिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नव्हता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समलैंगिक व्यक्तींना आता एकत्र राहण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच हाॅस्टेल प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी 'जेंडर न्यूट्रल' हाॅस्टेलची अधिसूचना काढली आहे. सद्यस्थितीतील देवनार येथील काॅलेजच्या ग्राऊंड फ्लोअरवर ही हाॅस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण २० विद्यार्थ्यांची सुविधा असलेल्या या हाॅस्टेलमध्ये १७ विद्यार्थी रहात आहेत.


हॉस्टेलचं नाव आहे 'इंद्रधनुष्य'

'टिस'ने या हाॅस्टेलचं नाव इंद्रधनुष्य असं ठेवलं आहे. नावाप्रमाणेच या हाॅस्टेलला सजावण्यातही आलं आहे. इंद्रधनुष्याच्या रंगातील झेंडे, स्कार्फ आणि पोस्टर सर्वत्र लावण्यात आले आहेत. हाॅस्टेलमधील डबलबेड असलेल्या १० खोल्या समलैंगिक विद्यार्थी आणि त्यांच्या जोडीदाराच्या आहेत.



हेही वाचा-

समलैंगिकता हा गुन्हा नाही - सर्वोच्च न्यायालय

नेमकं कसं आहे कलम ३७७?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा