Advertisement

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय होतंय डिजिटल

आतापर्यंत ग्रंथसंग्रहालयातील जवळपास १,७७७ पुस्तकांचं स्कॅनिक करून पूर्ण झालं असून ही पुस्तकं पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही सर्व साहित्यसंपदा वाचकांना मोफत वाचायला मिळणार आहे.

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय होतंय डिजिटल
SHARES

तरूण पिढी आॅनलाइन साहित्य वाचण्यास प्राधान्य देत असताना देशातील सर्वात जुन्या ग्रंथसंग्रहालयानेही हा बदल आत्मसात करत डिजिटल होण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार ठाण्यातील १२५ वर्षे जुन्या मराठी ग्रंथसंग्रहालयाने कात टाकत डिजिटल रुप धारण केलं आहे.


कधी झाली होती स्थापना?

विनायक लक्ष्मण भावे यांनी १८८३ मध्ये या ग्रंथालयाची स्थापना केली. नोव्हेंबर २०१७ पासून येथील पुस्तकांच्या डिजिटलायझेशनला सुरुवात झाली. तर येत्या जुलै महिन्यापासून या ग्रंथसंग्रहालयातील सर्व आॅनलाइन इ-बुक वाचकांना वाचायला मिळतील.


१,७७७ पुस्तकांचं स्कॅनिंग पूर्ण

आतापर्यंत ग्रंथसंग्रहालयातील जवळपास १,७७७ पुस्तकांचं स्कॅनिक करून पूर्ण झालं असून ही पुस्तकं पीडीएफ स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ही सर्व साहित्यसंपदा वाचकांना मोफत वाचायला मिळणार आहे.


काय होणार फायदा?

डिजिटलायझेशनमुळे १०० वर्षांपेक्षाही जास्त जुनी ग्रंथसंपदा वाचकांना घरबसल्या वाचता येईल. विविध विषयांवरील २.९ लाखापेक्षा जास्त पुस्तक आणि १६ शब्दकोश या ग्रंथालयात आहेत. त्या सर्व साहित्याचे लवकरच इ-बुक मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

पुस्तकांचं डिजिटायझेशन ही एक अतिशय उत्कृष्ट संकल्पना आहे. ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर जगभरातून कुठंही बसून या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं ग्रंथपाल प्रणाली खोबोले यांनी सांगितलं.



हेही वाचा-

शिटी वाजवून पठ्ठ्यानं उंचावलं भारताचं नाव!

मुंबईकरांनो, भटकंती करायचीये? मग या ५ ठिकाणी भेट द्या!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा