म्हाडा कार्यालयात अपंग दिन साजरा

 Pali Hill
म्हाडा कार्यालयात अपंग दिन साजरा
म्हाडा कार्यालयात अपंग दिन साजरा
See all

वांद्रे - वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात अपंग दिन साजरा करण्यात आला. 'म्हाडा अपंग मंडळ' तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक अपंग कर्मचारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या अपंग कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. कित्येकदा अपंगांसाठी असलेल्या सुविधा किंवा त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या जागा या इतरांकडून बळकावल्या जातात. तसंच रेल्वे स्थानकावर अपंग व्यक्तींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 'आम्ही नेहमी स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु सरकारी सुविधा आमच्या पर्यंत पोहोचतच नाही' अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.

Loading Comments