Advertisement

Women's day Special : मेकॅनिक' ताई!

गॅरेज म्हणजे पुरुषांची मक्तेदारी, असा अनेकांचा समज असतो. याच विचाराला फाटा दिलीय जयश्री बागवे यांनी...

Women's day Special : मेकॅनिक' ताई!
SHARES

समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला आपापल्या परीनं करत असतेच. असाच प्रयत्न मुंबईतल्या विक्रोळीत राहणाऱ्या जयश्री बागवे यांनी केलाय. गॅरेज म्हणजे पुरुषांची मक्तेदारी, असा अनेकांचा समज असतो. याच विचाराला फाटा दिलीय जयश्री बागवे यांनी

विक्रोळी कन्नवारनगर इथं राहणाऱ्या जयश्री बागवे यांनी अडचणींवर मात करत, अनेक आव्हानं पेलून पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईतील महिला मेकॅनिक अशी त्यांची ओळख. विक्रोळी इथल्याच चेतक गॅरेजमधल्या बॅक ऑफिसमध्ये जयश्री अकाऊंटंट म्हणून काम करत होत्या. पण गॅरेजमध्ये बिलिंग डिपार्टमेंट सांभाळता सांभाळता त्यांना मेकॅनिक क्षेत्रात आवड निर्माण झाली.

सुरुवातीला बिलिंग करताना मला गाडीचे पार्ट्स माहित नसायचे. पण त्याबद्दल जाणून घेण्यास मला प्रचंड उत्सुक्ता होती. पण याबद्दल मला कुणी व्यवस्थित समजवायचं नाही. उलट माझी मस्करी केली जायची. अखेर मी कोहिनूरमधून मेकॅनिकलचा सहा महिन्याचा बेसिक कोर्स शिकली. त्यानंतर माझा गाड्यांच्या पार्ट्स बद्दल असणारा संभ्रम दूर झाला

जयश्री बागवे, महिला मेकॅनिक

जयश्रीचा या क्षेत्रात येण्याचा निर्णय हा त्यांच्या कुटुंबियांसाठी धक्कादायक होता. महिलांसाठी हे क्षेत्र नाही, यात फक्त पुरुषच काम करतात, असा त्यांच्या घरच्यांचा समज होता. जयश्री यांनी दुसरं काहीही करावं. पण मेकॅनिकचं काम करू नये, असा घरच्यांचा आग्रहं होता. पण जयश्री यांना आता थांबवणं कठीण होतं. त्यांनी घरच्यांना समजवलं. पण घरचे तयार झाले नाहीत. अखेर घरच्यांची नाराजी पत्करत जयश्री या क्षेत्रात आल्या.

पण आता परिस्थिती बदलली आहे. माझं कर्तुत्व आणि मला मिळालेलं यश पाहून त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. मी काही तरी वेगळं करतेय याचा त्यांना अभिमान आहे.

जयश्री बागवे, महिला मेकॅनिक

अकाऊंटंट ते महिला मेकॅनिक असा जयश्री यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला. अनेकांनी त्यांची मस्करी उडवली आहे. एखाद्या गाडिच्या पार्ट्स बद्दल विचारल्यावर त्यांना चुकीची माहिती दिली जायची. गाडीच्या पार्ट्सची नावं चुकीची सांगितली जायची. पण या अडचणींवर मात करत अखेर जयश्री यांनी यश संपादित केलं.

मेकॅनिक क्षेत्रात येऊन जयश्री या सर्व कामांमध्ये पारंगत जाल्या आहेत. आता त्या कुणाच्या मदतीशिवाय गाडी धुण्यापासून ते रीपेर करण्यापर्यंत सर्व काही करू शकतात. पण त्यांची इच्छा आहे की इतर महिलांनी पण या क्षेत्रात पाऊल ठेवावं. यासाठी त्या इसा नावाच्या मेकॅनिकचे धडे देत आहेत. त्यामुळे काही वर्षांमध्ये जयश्री यांची प्रेरणा घेऊन इतर महिला देखील या क्षेत्रात येतील एवढं मात्र नक्की.  


Women’s Day च्या निमित्तानं जयश्री यांच्या जिद्दीची कहाणी वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला त्यांची कहाणी कशी वाटली याबद्दल नक्की कळवा.



हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा