Advertisement

सेक्स वर्कर्सच्या मुलींचं 'आजीचं घर'!

गेल्या काही वर्षांपासून आजीचं घर बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या गौरी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या ५ मुलींचा सांभाळ करत आहेत. जर आजीचं घर हे गौरीचं स्वप्न पूर्ण झालं, तर ५० हून अधिक मुलींना मायेचं एक छत उपलब्ध होईल.

सेक्स वर्कर्सच्या मुलींचं 'आजीचं घर'!
SHARES

०-२१ वर्षांची मुलगी सितारा...मनाशी एक स्वप्न बाळगून ती मुंबईत आली. दिसायला सुंदर पण नाजूक. फिल्म इंडस्ट्रीत अभिनेत्री बनण्याचं तिचं स्वप्न. पण नशीब बघा. परिस्थिती तिला कामाठीपुरात घेऊन येते आणि इच्छा नसतानाही ती वेश्याव्यवसायात फसते. आता इथून मागे फिरणं तिच्यासाठी अशक्य असतं. अखेर कामाठीपुरात राहून सेक्स वर्कर म्हणूनच काम करण्याचा निर्णय ती घेते.

काही वर्षांनी ती एका मुलीला जन्म देते. पण मुलीवर आपल्यासारखी वेळ येऊ नये अशी तिची इच्छा असते. यासाठी सितारा पोटच्या मुलीला एका कुटुंबाला २ लाखात विकते. पण हीच गोष्ट तिला आतल्या आत खात असते. आपण आपल्या मुलीला विकू कसं शकतो? याचीच तिला लाज वाटते. तिला मिळालेले २ लाख ती एका मंदिरात दान करते. पण मुलीपासून दुरावल्याची खंत तिच्या मनात कायम आहे.


देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी हक्काचं घरं

कामाठीपुरात अशा अनेक माता आहेत ज्यांच्यावर सितारासारखीच दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. काही आपल्या पोटच्या मुलांना विकत आहेत, तर काही त्यांना याच दलदलीत मोठं करत आहेत. कामाठीपुरातल्या महिलांसाठी काम करणाऱ्या गौरी सावंत यांनी हीच परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 'आजीचं घर' नावाची संकल्पना गौरी सावंत घेऊन आल्या आहेत. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलींना एक सुरक्षित आयुष्य मिळावं आणि त्यांचं योग्य रीतीनं संगोपन व्हावं, यासाठी गेल्या काही वर्षांपासून आजीचं घर बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या गौरी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या ५ मुलींचा सांभाळ करत आहेत. जर आजीचं घर हे गौरीचं स्वप्न पूर्ण झालं, तर ५० हून अधिक मुलींना मायेचं एक छत उपलब्ध होईल.


डोंगराएवढा निधी जमवण्याचा प्रयत्न

गौरी यांच्या आजीच्या घरातल्या मुलांचं संगोपन तृतीयपंथांमधील ज्येष्ठ व्यक्ती करणार आहेत. या प्रकल्पासाठी गौरीला ६० लाख रुपयांची गरज आहे. 'मिलाप' या फंडरेझिंग वेबसाईट आणि 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून जिंकलेल्या पैशातून ३५ लाख रुपयांची आर्थिक मदत जमवण्यात गौरीला यश आलं आहे.

गौरी यांनी काही वर्षांपूर्वी सहा वर्षांची मुलगी गायत्रीचं मातृत्व स्विकारलं होतं. गौरी तृतीयपंथी असल्यानं आई होऊ शकल्या नाहीत. पण आज देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलींचा हात धरून त्या खऱ्या अर्थानं आई झाल्या आहेत.

कव्हर फोटो सौजन्य



हेही वाचा

जेव्हा 'तो' एकदिवस 'ती'ची जागा घेतो...


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा