शोभा डेंची नको ती टिवटिव !

 Mumbai
शोभा डेंची नको ती टिवटिव !

मुंबई - वादग्रस्त आणि फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. शोभा डे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे छायाचित्र ट्विट केले आहे.

या ट्विट केलेल्या छायाचित्रात एक लठ्ठ पोलीस कर्मचारी दिसत आहे. शोभा डे यांनी त्याला उद्देशून ‘हेवी पोलीस बंदोबस्त इन मुंबई टुडे’, असा खिल्ली उडवणारा संदेश लिहला आहे.

 

 

पोलीस प्रशासनाकडूनही शोभा डे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. "मिस शोभा डे, विनोद आम्हालाही आवडतात. पण तुम्ही तो चुकीच्या संदर्भात केलात. फोटोतला गणवेश मुंबई पोलिसांचा नाही. तुमच्या सारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्ही अधिक चांगल्या वर्तनाची अपेक्षा ठेवतो," असे उत्तर पोलिसांनी दिले आहे.

 

पोलीस कर्मचाऱ्याची शारीरिक खिल्ली उडविल्याने अनेक ट्विटरकरांकडून शोभा डे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Loading Comments