Advertisement

कूल रिक्षातून अनाथ आश्रमासाठी १० हजारांचा निधी!


कूल रिक्षातून अनाथ आश्रमासाठी १० हजारांचा निधी!
SHARES

ओला-उबेरच्या काळात विक्रोळीमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका गारेगार रिक्षाची जोरदार चर्चा आहे. या रिक्षामध्ये प्रवाशांच्या सुखसोयीसोबतच सामाजिक भान जपत विलास पवार यांनी अनाथ आश्रमासाठी मदत म्हणून तब्बल १० हजार रुपयांचा निधी गोळा करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.रिक्षात लावली दानपेटी

विक्रोळीच्या कन्नमवारनगरमध्ये रहाणारे आणि अवघे चौथी पास असलेल्या विलास पवार यांनी वयाच्या 52 व्या वर्षी आपल्या रिक्षातून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास गारेगार व्हावा, यासाठी एका कुलरची निर्मिती केली. त्यानंतर या कुल रिक्षाची चर्चा सर्वत्र सुरू झाली.

पण विलास इथेच थांबले नाहीत. त्यांनी सामाजिक भान जपत खास अनाथ आश्रमाला मदत म्हणून निधी देता यावा, अशी आवाहन करणारी एक दानपेटी आपल्या रिक्षात लावली. प्रवासी वर्गाने देखील उत्तम प्रतिसाद देत अवघ्या तीन महिन्यांत या पेटीत तब्बल १० हजार रुपये जमा केले.यात पारदर्शकता असावी म्हणून विलास यांनी विक्रोळी पोलिसांकडून ही पेटी सीलबंद करून घेतली. त्यानंतर जमा झालेली रक्कम डीडीमार्फत आपल्या गावी म्हणजे धुळे जिल्ह्यातील एका अनाथ आश्रमाला आर्थिक मदत केली. तसेच 'ही रिक्षा म्हणजे अनाथ आणि वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्या मदतीचा रथ आहे', असे विलास अभिमानाने सांगतात.हेही वाचा

...आणि रिक्षाचा प्रवास झाला गारेगार!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा