Advertisement

कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरीचे मालक पराग देसाईंचा मृत्यू

15 ऑक्टोबर रोजी रस्त्यावरील कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली.

कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरीचे मालक पराग देसाईंचा मृत्यू
SHARES

गुजरातमध्ये टी प्रोसेसर्स अँड पॅकर्सचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याच्या हल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पराग देसाई हे लोकप्रिय वाघ बकरी ब्रँड चहासाठी ओळखले जात होते. अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. 

गेल्या आठवड्यात पराग देसाई (५०) मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. पराग देसाई यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परिशा असा परिवार आहे.

कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई 15 ऑक्टोबर रोजी इस्कॉन आंबळी रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. यावेळी त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात ते पडले आणि पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले. 

न्यूयॉर्कमधून एमबीए केले पराग देसाई यांच्यावर खासगी रुग्णालयात तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र दुर्दैवाने देसाई यांच्या प्रकृतीची गुंतागुंत जीवघेणी ठरली आणि रविवारी त्यांचे निधन झाले. 

प्रसिद्ध चहा समूहाचे चौथ्या पिढीतील उद्योजक देसाई यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले. पराग देसाई यांनी वाघ बकरी चहा समूहाच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ते विक्री, विपणन आणि निर्यात विभागाचे प्रमुख होते.



हेही वाचा

आता मुंबईतील रहिवासी ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा