मुंबईकर सुनीत जाधव शरीरसौष्ठवात तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’

मुंबईकर सुनीत जाधवनं चेन्नईत झालेल्या १२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’ किताब पटकावला आहे.

 • मुंबईकर सुनीत जाधव शरीरसौष्ठवात तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’
SHARE

सलग सहाव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ किताब पटकावणाऱ्या मुंबईकर सुनीत जाधवनं चेन्नईत झालेल्या १२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘भारत-श्री’ किताब पटकावला आहे. मागील वर्षी राम निवास याच्या किताबाचा मानकरी ठराल होता. मात्र, यंदा सुनितनं हा किताब जिंकला असून, गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’ जिंकण्याची करामात केली आहे.


चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची झुंज

इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सची झुंज सुरू होती. जेतेपदासाठी सुनीत जाधव, दिल्लीचा नरेंदर यादव आणि सेना दलाच्या अनुज कुमार तालियन यांच्यात चुरस रंगली होती. 

यावेळी जसेसनी या तिघांमध्ये कंपेरिझन करण्याचा निर्णय घेतला. ही कंपेरिझन झाल्यावर जसेसनी पुन्हा नरेंदर आणि अनुजला कंपेरिझनसाठी बोलावलं. त्यावेळी ही कंपेरिझन कोणत्या क्रमांकासाठी आहे, याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. मात्र, या कंपेरिझननंतर जसेसनी नरेंदर यादवला तिसरा क्रमांक जाहीर केला. त्यावेळी ही कंपेरिझन दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी होती हे स्पष्ट झालं आणि 'भारत श्री' किताबाचा मानकरी सुनित जाधव ठरला. 


तिसऱ्यांदा 'भारत श्री'

दरम्यान, काहीच महिन्यांपुर्वी सुनीत जाधवनं सलग सहाव्यांदा 'महाराष्ट्र श्री' किताब पटकावला होता. तसंच, सहा वेळा 'आशिया श्री' किताब देखील त्यांनी पटकावला आहे. त्याचप्रमाणं, त्यानं यंदा 'भारत श्री' किताबाला पटकावला असून गेल्या चार वर्षात तिसऱ्यांदा भारत श्री किताब पटकावला आहे.


भारत श्री स्पर्धेचा निकाल :


 • ५५ किलो - १) नेता सिंग (मणिपूर), २) अरुण चौधरी (गुजरात), ३) रॉनी कांता मैतेई (सेना दल)
 • ६० किलो - १) दिपू दत्ता (आसाम), २) नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), ३) मनोज लखन (रेल्वे)
 • ६५ किलो - १) दिनेश कांबळे (महाराष्ट्र), २) शशी कुमार (राजस्थान), ३) एम. बी. सतीशकुमार (रेल्वे)
 • ७० किलो - १) अनिल गुचीकर (ओदिशा), २) कोठनंदा रामन (रेल्वे), ३) विक्रम सिंग तोमर (दिल्ली)
 • ७५ किलो - १) अनिल बिलावा (महाराष्ट्र), २) दिनेश सिंग (मणिपूर), ३) भास्कर कांबळी (महाराष्ट्र)
 • ८० किलो - १) सागर कातुर्डे (आयकर), २) ए. मलिक (हरयाणा), ३) समिरन नंदी (प. बंगाल)
 • ८५ किलो - १) देवा सिंग (मणिपूर), २) प्रीतम चौगुले (रेल्वे), ३) निलकांता घोष (प. बंगाल)
 • ९० किलो - १) सुनीत जाधव (महाराष्ट्र), २) रिजू जोस पॉल (केरळ), ३) तमिलनबान (सेना दल)
 • १०० किलो - १) नरेंदर यादव (दिल्ली), २) दयानंद सिंग (सेनादल), ३) राजेंद्रन मणि (तामिळनाडू)
 • १०० किलोपुढील - १) अनुज कुमार तालियन (सेनादल), २) जावेद अली खान (रेल्वे), ३) विनय कुमार (दिल्ली)
 • 'भारत श्री' विजेता : सुनीत जाधव (महाराष्ट्र)हेही वाचा -

वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल बंद

मतदान केंद्रावर यंदा विविध सुविधा, लहानमुलांसाठी पाळणाघरसंबंधित विषय
ताज्या बातम्या