Advertisement

अॅथलेटिक्स स्पर्धेत गोयंका एज्युकेशन ट्रस्टचा विजय


अॅथलेटिक्स स्पर्धेत गोयंका एज्युकेशन ट्रस्टचा विजय
SHARES

मुंबई जिल्हा वार्षिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गोरेगावच्या गोयंका एज्युकेशन ट्रस्ट संघाने सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली. गोयंका संघाच्या मुले आणि मुलींच्या विविध गटांनी 102 गुण मिळवत चषकावर आपले नाव कोरले. ही स्पर्धा मंगळवारी कांदीवली येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात रंगली.

पुरुषांच्या 400 मीटर धावणे प्रकारात गोयंका एज्युकेशन ट्रस्ट संघाच्या राहुल कदम, व्हॅलेंटाईन फर्नांडिस आणि ओंकार दळवी या तिघांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. 200 मीटर धावणे प्रकारात राहुल रंजन, हितेश जाधव आणि दीपक कर्दे यांनी तीन स्थान मिळवून आपल्या संघाला आघाडीवर आणले. 500 मीटरच्या धावणे प्रकारातही गोयंका ट्रस्ट संघाच्या निखिल गावडेने प्रथम क्रमांक तर, सॅव्हिओ स्पोर्टस् क्लबच्या अक्षय धुमनुसरे याने दुसरा आणि केईएस श्रॉफ महाविद्यालयाच्या रमेश विश्वकर्मा याने तिसरा क्रमांक पटकावला. गोयंका एज्युकेशन संघाने मुलींच्या गटातही 65 गुणसंख्या मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली.

20 वर्षांखालील मुलांच्या 5000 मीटर धावणे स्पर्धेत गोयंका संघाच्या निलेश अर्सेकरने प्रथम क्रमांक पटकावला. 400 मीटर धावणे स्पर्धेत गुप्ता स्पोर्टस् अकादमीच्या खेळाडू संदीप सिंग, ओंकार दळवी आणि व्हॅलेंटाईन फर्नांडिस या तिघांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक काबीज करून 400 मीटर प्रकारात आपला दबदबा निर्माण केला.

20 वर्षांखालील मुलींच्या गटात 400 मीटर धावणे प्रकारात गोरेगावच्या प्रबोधिनी संघाच्या ईसाबेला लोबो हिने प्रथम क्रमांक मिळवला. मुलींच्या 18 वर्षांखालील 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रबोधिनीच्या डॅझिहाला माओने हिने प्रथम क्रमांक पटकावला. मुलांच्या 18 वर्षाखालील 400 मीटर धावणे प्रकारात प्रबोधिनी संघाचा यश चोप्रा प्रथम आला. 16 वर्षांखालील गटात लोखंडवाला फाऊंडेशच्या सप्तरंगी दास याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले.



हेही वाचा -  

शिवाजी शिक्षण संस्थेची धावणी, लंगडी स्पर्धा

टॅंकरचालकाच्या मुलाचा चिनी प्रतिस्पर्ध्याला दमदार ठोसा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा