'यशाचा मार्ग नेहमीच खडतर असतो' ही म्हण मुंबईच्या वेंकटेश शेट्टीला पाहिल की अगदी खरी वाटते! वेंकटेशने मान्सून स्कूटर रॅलीत चिखलातून मार्ग काढत 35 किमीचे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण केले. ही स्पर्धा 1 जुलैला नवी मुंबईत झाली. लॉरेन्स संघाचे प्रतिनिधीत्व करत असताना त्याने सर्वात कमी वेळात अडथळे पार करत लक्ष्य गाठले.
यावेळी वेंकटेशला प्रतिस्पर्धी असलेल्या रुस्तम पटेल, सय्यद आसिफ अली, अवतार सिंग, मनजीत सिंग आणि शमीम खान या अनुभवी रायडर्सचा सामना करावा लागला. पण दिग्गज रायडर्सना नमवत त्याने चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे क गटात 80 सीसी ते 160 सीसीमध्ये वेंकटेश शेट्टीने पहिला क्रमांक मिळवून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. यावेळी देशभरातील एकूण 54 रायडर्सनी यात सहभाग घेतला होता.
चिखल आणि खड्ड्यांसारख्या कठीण मार्गावर बाईक रायडिंग करुन वेंकटेशने 35 किमीचे अंतर 25 मिनिटे 15 सेकंदात पूर्ण केले आणि विजय मिळवला. तर, पुण्याचा पिंकेश ठक्कर हा उपविजेता ठरला. त्याने 25 मिनिटे 43 सेकंदांची वेळ नोंदवली. तसेच गतविजेता सय्यदला तिसऱ्या स्थानावर समाधानी व्हावे लागले. त्याने 25 मिनिटे 44 सेकंदाची वेळ नोंदवली. या स्पर्धेत मुंबईचा सर्वोत्तम रायडर म्हणून रुस्तम पटेल याने मान मिळवला.
या स्पर्धेत महिला गटात देखील मुंबईच्या स्पर्धकांनी आपली छाप सोडली. मुंबईच्या निधी शुक्लाने 37 मिनिटे 13 सेकंदांची वेळ नोंदवत विजेतपद पटकावले. तर प्रिया गाला हिने 42 मिनिटे 19 सेकंदांची वेळ नोंदवत उपविजेते पद पटकावले.
हे देखील वाचा -
बाईकवर आख्खा देश फिरणारा मुंबईचा पोलीस!
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)