Advertisement

उद्याचे खेळाडू की आजचे मजूर?


उद्याचे खेळाडू की आजचे मजूर?
SHARES

देशात विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. खेळाडूंना लहानपणापासूनच खेळाचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या स्पोर्ट कॉम्प्लेक्सवर असते. मात्र याच मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याचा प्रकार कांदिवलीतल्या साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये समोर आलाय. 20 एप्रिलला 14 वर्ष आणि 17 वर्ष वयोगटाले केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कांदिवलीतल्या साई स्पोर्टस् कॉम्पलॅक्समध्ये (क्लस्टर) ज्युडो या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या खेळाडूंनी स्पर्थेची तयारी करणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळंच दिसत होतं.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथल्या केंद्रीय विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना 20 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता पोहचणे बंधनकारक होते. ते विद्यार्थी त्या वेळेत पोहचलेही. मात्र या स्पर्धेच्या संदर्भातील कोणतीच व्यवस्था तिथे केली गेली नव्हती. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सायन कोळीवाडाच्या केंद्रीय विद्यालयाला देण्यात आली होती. त्या खेळाचे खुद्द प्रशिक्षकच सकाळी साडेअकरा वाजता आले. 

त्या ठिकाणी मुलांसाठी खाण्या-पिण्याची सोय देखील करण्यात आली नव्हती. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून चक्क सर्व कामे करून घेतली गेली. या क्लस्टर स्पर्धेत विजय मिळवलेले विद्यार्थीच पुढे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. जर आताच ही स्थिती असेल तर या खेळाडूंचं भवितव्य काय असेल असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा