Advertisement

खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत रंगणार


खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत रंगणार
SHARES

राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषदेतर्फे मुंबई उपनगरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात अालं अाहे. बोरीवलीतील शिंपोली इथं रंगणाऱ्या या स्पर्धेला १३ एप्रिलपासून सुरुवात होणार असून १५ एप्रिलला अंतिम लढती रंगणार अाहेत.


३०० खेळाडूंचा सहभाग

फ्री-स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला फ्री-स्टाईल गटामध्ये १० वजनी गटात ही राज्यस्तरीय स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. फ्रीस्टाईल गटात १००, ग्रीको रोमन गटात १०० अाणि महिला फ्रीस्टाईल गटात १०० असे मिळून ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार अाहेत.


३१ लाखांची बक्षिसे

या स्पर्धेत विजेत्यांना ३१ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार अाहेत. तिन्ही प्रकारातील विजेत्यांना प्रत्येकी १० लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांनी गौरवण्यात येईल. क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून अाॅलिम्पिक पैलवान नरसिंग यादवची उपस्थिती सर्वांचे अाकर्षण ठरणार अाहे.


स्पर्धेचं कारण?

भारतासाठी पहिलंवहिलं अाणि कुस्तीतील पहिलं पदक कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी अाॅलिम्पिकमध्ये मिळवून दिलं होतं. स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून राज्य स्तरावर त्यांच्या नावानं स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येतं.


हेही वाचा -

पैलवानांनाही मिळणार पेन्शन...!

बालेवाडीत रंगणार महाराष्ट्र कुस्ती लीगची दंगल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा