Advertisement

महाराष्ट्र सिव्हिक फेडरेशन, पीसीएलचा अंतिम फेरीत प्रवेश


महाराष्ट्र सिव्हिक फेडरेशन, पीसीएलचा अंतिम फेरीत प्रवेश
SHARES

बीएसएएम चेंबूर जिमखाना बिलियर्ड लीग 2017 च्या स्पर्धेत मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आणि खार जिमखाना या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत उत्कृष्ट असा खेळ करत विजय मिळवला. ही स्पर्धा बुधवारी चेंबूर जिमखानाच्या बिलियर्ड हॉलमध्ये रंगली. फेडरेशनने 429-294 अशा फरकाने विजय मिळवत बीच बॉयचा पराभव केला.

यावेळी झालेल्या इतर उपांत्य सामन्यांत महाराष्ट्र सिव्हिक फेडरेशनचा 630-536 अशा फरकाने पराभव करत खार जिमखानाने अंतिम फेरीत प्रवेश केला. खार जिमखान्याच्या स्पर्श फेरवानी याने महाराष्ट्र सिव्हिक फेडरेशनच्या धर्मेश मिस्त्रीला 200-101 अशा फरकाने हरवले.

क्रेइश गुरबक्सानीने अमित जोशीला 200-138 अशा फरकाने मात दिली. अनुभवी रिशभ ठक्करने अवेनीश शाहला 200-82 इतक्या मोठ्या फरकाने धूळ चारत विजय मिळवला. या तिघांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे खार जिमखान्याला विजय मिळवण्यात यश आले. मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही महाराष्ट्र सिव्हिक फेडरेशन हा संघ उपविजेता ठरला आहे.

महाराष्ट्र सिव्हिकच्या मेहूल सुतारीया, रोहन जांबुसरिया आणि चंदू कंसोडरिया यांनी अनुक्रमे पीसीएल बीच बॉयच्या विशाल गेहानी 200-116, अमित सप्रु 200-35, ललित झाम 36-3 अशा गुण संख्येने हरवत अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा प्रवेश मिळवला आहे.




हे देखील वाचा - 

बिलियर्ड्स लीग स्पर्धेत हिंदू जिमखाना विजयी

बिलियर्ड स्पर्धेत पार्क क्लबचा विजय


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा