Advertisement

ऑलिम्पिकच्या धर्तीवर राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धांचा प्रस्ताव

आगामी काळात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे ऑलिम्पिकच्या धर्तीवर महाराष्ट्रात राज्य आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी सांगितलं आहे.

ऑलिम्पिकच्या धर्तीवर राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धांचा प्रस्ताव
SHARES

आगामी काळात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे ऑलिम्पिकच्या धर्तीवर महाराष्ट्रात राज्य आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी सांगितलं आहे. शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्याला ५० वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांचं स्वरुप बदलणं - काळाची गरज" या विषयावर झालेल्या आॅनलाईन राज्यस्तरीय परिसंवादात सहभागी होताना शिरगावकर यांनी हे संकेत दिले. (maharashtra olympic committee will organise state and district level sports competition soon)

या परिसंवादात राज्यातील १४०० क्रीडाप्रेमींनी फेसबुक लाईव्ह मीटिंगद्वारे सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. परिसंवादामध्ये बोलताना भारतीय धनुर्विद्या महासंघाचे सचिव प्रमोद चांदुरकर म्हणाले, नवनवीन खेळांना प्रोत्साहन देणं व खेळाचं आयोजन तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत योग्य पद्धतीने व्हावं यावर भर देणं गरजेचं आहे. नामदेव शिरगावकर यांनी केंद्रीय क्रीडा विभागाप्रमाणेशालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग वेगवेगळ्या करण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं. महाराष्ट्र ऑलम्पिकचे सदस्य अशोक दुधारे यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या संघटक व कार्यकर्त्यांनाही शिवछत्रपती राज्य पुरस्कार पुन्हा सुरू करावा यावर भर दिला.

हेही वाचा - आयपीएलच्या तारखांची घोषणा, 'या' दिवशी होणार पहिला सामना

परिसंवादात वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातील खेळाडू पालक मार्गदर्शक शिक्षक क्रीडा कार्यकर्ते व संघटक सहभागी झाले होते. त्यात नाशिकचे क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुणे - शिवाजी गोरे, क्रीडा मार्गदर्शक डॉ.उदय डोंगरे क्रीडा मार्गदर्शक, प्राध्यापक अभय बिराज, पीयूष अंबुलकर, नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी परमेश्र्वर मोरे पालक प्रतिनिधी सागर गुल्हाने यांचा समावेश होता. 

हा परिसंवाद यशस्वी होण्यासाठी कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, परिसंवादाचे समन्वयक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर, कार्याध्यक्ष उदय नाईक, कार्यवाह राजेंद्र शेटे, क्रीडा शिक्षक गजानन वाघ, क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे, क्रीडाचे तांत्रिक जाणकार गुणेश सर यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा - युएईमध्ये होणार आयपीएलचा 13वा हंगामा 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा