Advertisement

टी २० वर्ल्डकप होणार की नाही? ICC चा मोठा खुलासा

ही स्पर्धा होणार की नाही, स्पर्धेचं वेळापत्रक पुढं ढकलण्यात येणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सतावत असताना इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) टी २० वर्ल्डकपबाबत मोठा खुलासा केला आहे.

टी २० वर्ल्डकप होणार की नाही? ICC चा मोठा खुलासा
SHARES

कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातल्याने लहानमोठ्या सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत. भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लिग (IPL) पुढे ढकलण्यात आल्यापासून सर्वांना वेध लागलेत ते आॅस्ट्रेलियात होऊ घातलेल्या टी २० क्रिकेट (t 20 cricket world cup) वर्ल्डकपचे. ही स्पर्धा होणार की नाही, स्पर्धेचं वेळापत्रक पुढं ढकलण्यात येणार का? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सतावत असताना इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलने (ICC) टी २० वर्ल्डकपबाबत मोठा खुलासा केला आहे. 

हेही वाचा- Corona Virus : आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचे नुकसान

अनेक क्रीडा स्पर्धा रद्द

जगभरातील सगळेच देश कोरोनाच्या (coronavirus) दहशतीच्या सावटाखाली आहेत. अनेक खेळाडूंनाही या व्हायरसची लागण झाल्याने क्रीडाक्षेत्रातूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी फुटबाॅल, टेनिस, हाॅकी, बॅडमिंटन, बाॅक्सिंग, अॅथलेटिक्स, बास्केटबाॅल, नेमबाजी इ. खेळांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत. जपानमध्ये होऊ घातलेल्या आॅलिम्पिंकच्या आयोजनावरही कोरोनाचं सावट आहे. 

आयपीएल १५ एप्रिलला

अशा तणावग्रस्त वातावरणात क्रिकेटच्या खेळाडूंना कोरोनाचा (COVID-19) फटका बसू नये म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेसोबतची वन डे मालिका रद्द केली. तसंच आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला. 

तर, आॅस्ट्रेलियामध्ये (australia) १८ आॅक्टोबर ते  १५ नोव्हेंबर २०२० दरम्यान पुरूषांची टी २० क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात येईल की नाही, यावर विचारविनिमय सुरू असताना, सप्टेंबर, आॅक्टोबरपर्यंत परिस्थिती निवळेल, असा विश्वास आयसीसीला (icc) वाटत आहे, त्यामुळे ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होईल, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा- इंग्लंडच्या सलामीवीर फलंदाजाला झाला कोरोना

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement