SHARE

मुंबईची कँडिडेट मास्टर सुहानी लोहिया हिने झारखंड येथील रांची इथं झालेल्या ३२व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत ९ वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावण्याची किमया केली अाहे. धीरूबाी अंबानी स्कूलमध्ये शिकणाऱ्या ९ वर्षांच्या सुहानीने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत ११व्या फेरीत महत्त्वपूर्ण गुण मिळवला अाणि ९ गुण खात्यात जमा केले. मुंबईच्या सुहानीने पश्चिम बंगालच्या स्नेहा हल्दर हिच्याशी ९ गुणांनिशी बरोबरी साधली. मात्र सर्वोत्तम टायब्रेकरनुसार स्नेहा हिला सुवर्णपदक देण्यात अाले. त्यामुळे सुहानीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


कुश भगतचे पदक हुकले

मुलांच्या ९ वर्षांखालील गटात मुंबईचा कँडिडेट मास्टर कुश भगत याने २७४ स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत सुरेख कामगिरी केली, मात्र पदकाने अखेर त्याला हुलकावणी दिली. अमेरिकन स्कूलचा विद्यार्थी असलेल्या कुशने या स्पर्धेत एकही पराभव पत्करला नाही. त्याने ११ सामन्यांत सात विजय अाणि चार सामने बरोबरीत सोडवत ९ गुण मिळवले. त्याने तामिळनाडूच्या अव्वल मानांकित इलामपार्थी ए. अार. यालाही पराभवाचा धक्का दिला होता. अखेर इलामपार्थी यानेच सुवर्णपदकाला गवसणी घातली.


सुहानी देशाचे प्रतिनिधित्व करणार

या स्पर्धेत सहावे मानांकन मिळालेल्या सुहानीने अात्मविश्वासाने खेळ करत काही तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध धमाकेदार विजय नोंदवले. तिने अखेरच्या फेरीत तीन वेळा राष्ट्रीय विजेती अाणि अाशियाई स्कूल्स तसेच राष्ट्रकुल विजेती ठरलेल्या शेफाली ए. एन. हिला पराभूत केले. सुहानीला अाता वेईफंग, चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप २०१८ मध्ये तसेच बेलारूस येथील वर्ल्ड कॅडेट रॅपिड अँड ब्लिट्झ चॅम्पियनशिप २०१९ अाणि अाशियाई यूथ चेस चॅम्पियनशिपमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार अाहे.


हेही वाचा -

शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांची अाशिया चषकातून माघार

क्रांती साळवीची नऊवारी नेसून मॅरेथाॅनमध्ये धाव, गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद

युवा बुद्धिबळपटू सुहानीची केरळवासीयांना मदतसंबंधित विषय
ताज्या बातम्या