• मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगचा थरार २१ जानेवारीपासून रंगणार
SHARE

क्रिकेट हा खेळ म्हणजे मुंबईचा अाणि मुंबईकरांचा श्वास अाणि ध्यास. क्रिकेटने देशाला अाजपर्यंत अनेक क्रिकेटपटू दिले. अाजही फावल्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशी असंख्य मुले रस्त्यावर किंवा मैदानांवर क्रिकेट खेळताना दिसतात. त्यांच्यातील गुणांना वाव देण्यासाठी अाता मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगचे (एमएमपीएल) अायोजन करण्यात अाले अाहे. ही टी-२० स्पर्धा मुंबई पोलीस जिमखान्यावर २१ जानेवारीपासून रंगणार अाहे. या स्पर्धेचा जर्सी अनावरणाचा सोहळा १४ जानेवारीला होणार असून श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रोमेश कालुवितरणा हे  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.


मुंबईतल्या विविध भागातील ८ टीम्स

या स्पर्धेत २५ ते ३२ वयोगटातील मुंबईकरांना सहभागी होता येणार असून मुंबईतल्या विविध भागातील ८ टीम्स पहिल्या पर्वात एकमेकांशी झुंजतील. प्रत्येक टीमला ६ लीग सामने खेळावे लागणार असून त्यानंतर उपांत्य फेरी अाणि अंतिम फेरीचा सामना होईल.टीम अाणि त्यांचे मालक

चेंबूर - अाशिष गोयल

बोरीवली - प्रेम रामचंदानी

जुहू हिरोज - संजय गुप्ता

सांताक्रूझ - अजय चतुर्वेदी

बांद्रा बस्टर्स - सुशील गुप्ता

मुलुंड चॅलेंजर्स - विजय जैन

वरळी - सागर पारीख

शिवाजी पार्क - मुंबई लाईव्ह


माजी अांतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह खेळण्याची संधी

क्रिकेटमध्ये ज्या प्रशिक्षकांनी अाणि अनेक व्यक्तींनी योगदान दिलं अाहे, त्यांच्यासाठी मदतनिधी सामन्याचे अायोजन करण्यात अाले अाहे. या मदतनिधी सामन्यात माजी अांतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंविरुद्ध खेळण्याची संधी या लीगमधील विजेत्या टीमला मिळणार अाहे.


पुरस्कर्त्यांचे पाठबळ

साई इस्टेट चेंबूर प्रायव्हेट हे या लीगचे मुख्य पुरस्कर्ते असून श्री. अमित वाधवानी यांनी या लीगची संपूर्ण जबाबदारी अापल्या खांद्यावर घेतली अाहे. मुंबई मास्टर्स प्रीमिअर लीगला २१ जानेवारी २०१८ पासून सुरुवात होणार असून ही स्पर्धा मार्च महिन्याच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत रंगणार अाहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या