Advertisement

मुंबई पोलीस दलातला हाच खरा 'आयर्नमॅन'


मुंबई पोलीस दलातला हाच खरा 'आयर्नमॅन'
SHARES

आतापर्यंत विविध गुन्ह्यांची उकल करत नामचीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश गुन्हेगारांचे 'कर्दनकाळ' म्हणून सर्वपरिचित आहेत. मात्र आता त्यांनी स्वत:ची नवी ओळख निर्माण केलीय, ती म्हणजे 'आयर्नमॅन'. फ्रान्समध्ये झालेल्या 'ट्रायथलाॅन' स्पर्धेत कृष्ण प्रकाश यांनी ४ किमी स्विमिंग, १८६ किमी सायकलिंग आणि ४२ किमी रनिंग असे तीन खेळ प्रकार केवळ १४ तास ८ मिनिटांत पूर्ण करत 'आयर्नमॅन' हा खिताब पटकावला आहे. अशी कामगिरी करणारे कृष्ण प्रकाश मुंबई पोलीस दलातील पहिले अधिकारी ठरले आहेत.  


कोण आहेत कृष्ण प्रकाश?

कृष्ण प्रकाश हे १९९८ च्या बँचचे पोलीस अधिकारी आहेत. राज्यात ठिकठिकाणी कर्तव्य बजावणारे कृष्ण प्रकाश २०१२ मध्ये मुंबईतील दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभारही त्यांनी सांभाळला आहे. सध्या ते आयजी, व्हिआयपी सिक्युरिटीज म्हणून कार्यरत आहेत.



या खेळात १८६ किमी सायकलिंग, ४ किमी स्विमिंग आणि ४२ किमी रनिंग हे क्रीडा प्रकार १६ तासांत पूर्ण करायचे असतात. कृष्ण प्रकाश यांनी हे सर्व प्रकार केवळ १४ तास ८ मिनिटांत पूर्ण करत 'आयर्नमॅन'चा किताब मिळवला. २०१५ मध्ये प्रसिद्ध माॅडल मिलिंद सोमण याने, तर २०१७ मध्ये सुपरकपल कौशिक मुखर्जी आणि विनिता सिंह यांनी ही स्पर्धा यशस्वीपूर्ण पूर्ण केली होती. त्यामुळे हा खिताब पटकवणारे कृष्ण प्रकाश हे दुसरे भारतीय 'आयर्नमॅन' तर पोलीस दलातील पहिले अधिकारी ठरले आहेत.



इतक्या अवघड स्पर्धेत मी सहभागी सहभागी झालो आणि त्यात यशही मिळाले याचा मला खूप आनंद आहे. या यशात माझे कुटुंब, मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या सहाकार्यामुळेच मी हे यश गाठू शकलो.

-कृष्ण प्रकाश, आयपीएस अधिकारी



हेही वाचा -

जग जिंकणारा दादरचा आयर्नमॅन!


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा