Advertisement

रत्नागिरी कॅरम लीगमध्ये मुंबईकरांचे वर्चस्व


रत्नागिरी कॅरम लीगमध्ये मुंबईकरांचे वर्चस्व
SHARES

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने अायोजित करण्यात अालेल्या रत्नागिरी कॅरम लीगच्या तिसऱ्या पर्वात कॅरम मास्टर्सने बाजी मारली असली तरी या संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांचे वर्चस्व पाहायला मिळाले. कॅरम मास्टर्सने अंतिम फेरीत रवी स्ट्रायकर्सचा २-१ असा पराभव करून जेतेपद पटकावले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेची निवड करण्यात अाली.


सुरुवातीलाच विजेतेपद निश्चित

कॅरम मास्टर्सचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या मुंबईच्या रियाझ अकबरअलीने एकेरीच्या पहिल्या सामन्यात रवी स्ट्रायकर्सच्या दिनेश पारकरला २५-७, २३-९ असे पराभूत केले. त्यानंतर संजय कोंडविलकर-असगर कोतावडेकर या जोडीने फर्झम काझी-जाहूर कोतावडेकर यांना हरवत कॅरम मास्टर्सला २-० अशी अाघाडी मिळवून दिली. रवी स्ट्रायकर्सच्या मोहम्मद गुफरानने विजय मिळवूनही त्यांना हार पत्करावी लागली.


क्यू ९ तिसऱ्या स्थानी

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत क्यू ९ संघाने मातोश्री विनर्सचा ३-० असा पराभव केला. क्यू-९ संघाचा कर्णधार अनिल मुंढेने दस्तगीर शेखच्या साथीने झेद अहमद-सुनील जाधव यांना हरवले. त्यानंतर गिरीश तांबे-अभिजित खेडेकर यांनी मातोश्री विनर्सच्या योगेश परदेशी-दीपक वाटेकर यांना पराभूत केले. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत विजय कोंडविलकरने राहुल कदमवर मात करत क्यू ९ संघाला ३-० असा विजय मिळवून दिला.


हेही वाचा -

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'

सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, करणार कोचिंग!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा