Advertisement

राजू सिंहच्या दोन गोलमुळे पोर्ट ट्रस्ट विजयी


राजू सिंहच्या दोन गोलमुळे पोर्ट ट्रस्ट विजयी
SHARES

मुंबई हॉकी असोसिएशन लीग (एमएचएएल) मध्ये महाराष्ट्र पोलीस संघाचा ५-३ अशा फरकाने पराभव करत पोर्ट ट्रस्टने सुपर डिव्हिजन सामन्यात विजय मिळवला. ही स्पर्धा चर्चगेट येथील महिंद्रा स्टेडियम येथे रंगली होती.

या रोमांचक लढतीत पोर्ट ट्रस्टच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करत सामन्यात विजय मिळवला. पोर्ट ट्रस्टच्या राजू करण सिंह याने सुरुवातीलाच पेनल्टी कॉर्नरला ३३ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला गोल करणाऱ्या राजू सिंहने सामनावीर पुरस्कार पटकावला.

हा आक्रमक खेळ चालू असताना पोर्ट ट्रस्ट संघातील सतिष पाटील याने ५४ व्या मिनिटाला गोल केला, त्यानंतर लगेचच ६० व्या मिनिटाला अतुल सिंघ याने आणि ६६ व्या मिनिटाला वेंकटेश देवकर याने गोल करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी महाराष्ट्र पोलीस संघाला ५-३ ने पराभव पत्कारावा लागला.



हेही वाचा - 

मुंबई हॉकीमध्ये भारत पेट्रोलिय कॉर्पोरेशनचा पराभव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा