Advertisement

मुंबई हॉकीमध्ये भारत पेट्रोलिय कॉर्पोरेशनचा पराभव


मुंबई हॉकीमध्ये भारत पेट्रोलिय कॉर्पोरेशनचा पराभव
SHARES

तेराव्या पीएमसी बॅंक गुरु तेग बहादूर गोल्ड कप ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंटमध्ये जालंधर येथील पंजाब पोलिसांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या भारत पेट्रोलिय कॉर्पोरेशन लिमिटेड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ही स्पर्धा मंगळवारी चर्चगेटच्या महिंद्रा स्टेडिअम येथे खेळवण्यात आली. 

पंजाब संघाच्या सरवंजीत सिंग याने 29 व्या मिनिटाला गोल करत सामना फिरवला आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. पण बीपीसीएल संघाला एकही गोल करण्यात यश आले नाही.



याआधी झालेल्या सामन्यात दिपक ठाकूरच्या दोन गोलामुळे इंडियन ऑईल संघाने आघाडी घेतली. यामध्ये पूल-ब गटात 7-1 अशा फराकने सेंट्रल रेल्वे संघाला पराभवला सामोरे जावे लागले.

या सामन्यात इंडियन ऑईलच्या सुनील यादव याने 35 व्या मिनिटाला गोल केला तर, रोशन मींझ याने 37 व्या मिनिटाला, सुखजीत सिंगने 43 व्या मिनिटाला, हरप्रीत सिंग 61 व्या आणि प्रभज्योत सिंगने 68 व्या मिनिटाला गोल केला. सेंट्रल रेल्वेच्या राजेंद्र पवार या एकाच खेळाडूने शेवटच्या 67 व्या मिनिटाला गोल केला.


हेही वाचा - 

हॉकी इंडिया लीगमध्ये दबंग मुंबईचा पराभव

हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबईचा दणदणीत विजय



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा