Advertisement

रोहित शर्माला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

रोहित शर्माला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
SHARES

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांना यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी यांनाही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.  २९ ऑगस्ट रोजी व्हर्चुअल पद्धतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


याशिवाय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.


द्रोणाचार्य पुरस्कार

खेळाडूखेळ
धर्मेंद्र तिवारीआर्चरी
पुरुषोत्तम रायएथलेटिक्स
शिव सिंहबॉक्सिंग
कृष्ण कुमार हूडाकबड्डी
रमेश पठानियाहॉकी
नरेश कुमारटेनिस
विजय भालचंद्र मुनिश्वरपैरा पॉवर लिफ्टिंग
ओम प्रकार दाहियारेसलिंग


अर्जुन पुरस्कार

खेळाडूखेळ
अतनु दासआर्चरी
दुती चंदएथलेटिक्स
सात्विक साईराजबैडमिंटन
चिराट शेट्टीबैडमिंटन
विशेषबास्केटबॉल
सूबेदार मानिक कौशिकबॉक्सिंग
लवलीनाबॉक्सिंग
इशांत शर्माक्रिकेट
दीप्ति शर्मामहिला क्रिकेट
सावंत अजयइक्विस्ट्रियन
संदेश झिंगनफुटबॉल
अदिति अशोकगोल्फ
आकाशदीप सिंहहॉकी
दीपिकाहॉकी
दीपककबड्डी
सारिका सुधाकरखो-खो
दत्तू बबनरोइंग
मनु भाकरशूटिंग
सौरभ चौधरीशूटिंग
मधुरिका सुहासटेबल टेनिस
दिविज सरनटेनिस
शिवा केशवनविंटर स्पोर्ट्स
दिव्या काकरनरेसलिंग
राहुल अवारेरेसलिंग
सुयश नारायण जाधवपैरा स्वीमिंग
संदीपपैरा एथलेटिक्स
मनीष नरवालपैरा शूटिंग



हेही वाचा -

धोनीनं मारलेला षटकार जिथे पडला, ते आसन राखीव ठेवण्याची एमसीएकडे विश्वस्तांची मागणी

IPL च्या १३ व्या हंगामासाठी नवा प्रायोजक मिळाला




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा