सतीश सबनीस खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत दीड लाखांची बक्षिसे


  • सतीश सबनीस खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत दीड लाखांची बक्षिसे
  • सतीश सबनीस खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत दीड लाखांची बक्षिसे
SHARE

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क जिमखान्यावर ११ मार्चला बुद्धिबळाचा थरार रंगणार अाहे. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनच्या मान्यतेने ११ मार्च २०१८ रोजी रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून सतीश सबनीस खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे पाचवे पर्व रंगणार अाहे. विविध गटांत खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांना दीड लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार अाहेत. अंध बुद्धिबळपटूंची स्पर्धा हे सतीश सबनीस बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे विशेष अाकर्षण ठरणार अाहे. स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका ९ मार्च २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शिवाजी पार्क जिमखान्यावर स्वीकारल्या जातील. स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क असेल. प्रत्येक फेरी ३० मिनिटांची खेळवण्यात येणार असून बक्षिसे विभागून देण्यात येणार नाहीत.विजेत्याला २१ हजारांचे इनाम

सतीश सबनीस खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्याला २१ हजार रुपयांचे बक्षिस अाणि अाकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल. उपविजेता १५ हजारांचा मानकरी ठरेल. तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यास ११ हजारांचे तर चौथा क्रमांक मिळवणाऱ्यास ९ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल. या स्पर्धेत ३०व्या क्रमांकापर्यंत रोख बक्षिसे देण्यात येणार अाहेत. पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास ८ हजार, सहाव्या क्रमांकाला ७ हजार, सातव्या क्रमांकाला ६ हजार, अाठव्या क्रमांकाला ५ हजार, नवव्या क्रमांकाला ४ हजार अाणि दहाव्या क्रमांकाला ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. ११ ते २० क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे तर २१ ते ३० क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ८०० रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येईल.


विविध गटात खेळवली जाणार स्पर्धा

खुल्या रॅपिड फायर स्पर्धेसह विविध गटात ही स्पर्धा खेळवण्यात येणार अाहे. महिला गटातील विजेतीला २ हजार रुपयांचे तर उपविजेतीला १ हजार रुपयांचे इनाम देण्यात येईल. वरिष्ठ गटातील पहिल्या दोन विजेत्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षिस मिळेल. अंध बुद्धिबळपटूंच्या गटातील विजेत्याला २ हजार रुपयांचे तर उपविजेत्याला १ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबर ६, ८, १०, १२, १४ अाणि १६ या वयोगटातही ही स्पर्धा खेळविण्यात येणार अाहे. मुला-मुलींच्या गटातील विजेता प्रत्येकी २ हजार रुपयांचा मानकरी ठरेल.


असा भरा अाॅनलाइन अर्ज

संबंधित विषय
ताज्या बातम्या